ताज्याघडामोडी

भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरु करा – शैला गोडसे

मंगळवेढा तालुक्‍याच्या दक्षिण भागातील 39 गावाची भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गेल्या सात महिन्यापासून बंद असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे सदरची योजना तातडीने सुरू करण्यात यावे या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या जिल्हा नेत्या शैला गोडसे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

 या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने 39 गावासाठी राबवण्यात आलेल्या भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे 31 मे 2020 अखेरीस हस्तांतरण करण्यात आले असून ही योजना जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे वर्ग करण्यात आली परंतु योजना वर्ग झाल्यापासून आजतागायत या भागातील लोकांना पाणी मिळणे बंद झाली त्यामुळे येथील नागरिकांनासह ग्रामपंचायतीला येथील पाणीपट्टीचा भुर्दंड भरावा लागणार आहे. गतवर्षी समाधान समाधानकारक पावसामुळे उजनी धरण पूर्णपणे भरले आहे त्यामुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण होणार नाही मात्र प्रशासनाकडून मात्र योजना बंद ठेवून सोयीस्कररित्या जनतेला त्रास देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे पुढील महिन्यात सुरू होणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता ही योजना तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने ही योजना सुरू करण्याच्या बाबतीत लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी मुख्याधिकारी जिल्हा परिषद यांना दिलेल्या काय झालं निवेदनात नमूद केली आहे

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago