चित्रपट आणि मालिकांमध्ये काम देण्याच्या बहाण्याने स्ट्रगलिंग अॅक्ट्रेसला देहविक्री व्यापारात ढकलल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने 3 कास्टिंग डायरेक्टर्सना अटक केली आहे. या कारवाईत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे. आरोपींनी पीडित मुलीला साडेतीन लाखात विकले असल्याचेही तपासात समोर आले आहे. सदरील घटना गुरुवारी रात्रीची आहे.
समाजसेवा शाखेचे डीसीपी राजू भुजबळ यांनी सांगितले की, 14 वर्षांच्या मुलीची विक्री करणार असल्याची खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती. यानंतर एका पोलिस कर्मचाऱ्याला बनावट ग्राहक बनवून त्यांच्याकडे पाठवले आणि कास्टिंग डायरेक्टर आशिष पटेल, विनोद अनेरिया आणि मो.शेख यांना सौदा करताना पोलिसांनी अटक केली.
सौद्यादरम्यान एका आरोपीने म्हटले की, ते चौदा वर्षांच्या मुलीला वेश्या व्यवसायासाठी पुरवतील आणि ते प्रत्येक वेळी साडेतीन लाख रुपये घेतील. एका आरोपीने सांगितले की – ते चौदा वर्षांच्या मुलीला वेश्या व्यवसायासाठी पुरवतील आणि ते प्रत्येक वेळी साडेतीन लाख रुपये घेतील. आरोपी हे वारंवार सांगतच राहिले, कारण मुलगी चौदा वर्षांची आणि अल्पवयीन असल्याने तिच्यासाठी प्रत्येक वेळी साडेतीन लाख रुपयांची मागणी केली जाईल.या व्यवहारानंतर पोलिस पथकाने अंधेरी येथील हॉटेलमध्ये सापळा रचला. येथेच पीडितेसोबत आरोपी कास्टिंग डायरेक्टरला बोलावले होते. पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्या एका व्यक्तीला ग्राहक म्हणून अंधेरी रेल्वे स्थानकाजवळील रेस्टॉरंटमध्ये पाठवले. तीन आरोपी कास्टिंग डायरेक्टर त्या अल्पवयीन मुलीसह तेथे पोहोचताच पोलिस पथकाने त्वरित तिघांना अटक केली आणि पीडित मुलीला त्यांच्या तावडीतून सोडवले.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…