६ लाख ६६ हजारांच्या फसवणूक प्रकरणी राज पाटील यांच्यासह तिघांविरोधात फिर्याद दाखल

विवाह संस्थेमध्ये काम करून महिना १५ हजार रुपये मिळतील असे सांगत तसेच आंतरजातीय विवाहासाठी शासनाकडून ८० हजार रुपये मिळवून देतो,विजातीय विवाहासाठी ५० हजार मिळवून देतो आमची  महाराष्र्ट् शासन संचलित नवरी मिळे नव-याला या नावाने सदरची संस्था असून सदर संस्था मार्फत आंतरजातिय विवाह झालेल्ा नवरी व नव-याला शासन अनुदान देते व त्याकरिता तुम्ही काही सदस्यांना आपल्या संस्थेचे सभासद करून ज्यांचे लग्न होत नाही अथवा ज्यांना लग्न करायचे आहे अशा व्यक्तींना त्याबाबतची माहिती देवून त्यांचे लग्न जमवून देण्याची आपल्या संस्थेची इतर सलग्न असलेल्या स्त्री पुरुषांची ओळख करून देवून त्यांचे लग्न जमवून दिले जाते अशा भूलथापा मारत सुस्ते तालुका पंढरपूर येथील शहाजी शिवाजी शिंदे यांच्यासह विवाह जमविण्याचे व साखर पुड्याचे आमिष दाखवून १५ व्यक्तीची  आर्थिक फसवणूक केली असल्याची फिर्याद शहाजी शिवाजी शिंदे वय- 35 वर्ष धंदा मजूरी रा.सुस्ते ता.पंढरपूर यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली असून या प्रकरणी अंधेरी मुंबई येथील राज पाटील,सचिन परमानंद बनसोड , सागर अनिल जाधव यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
राज पाटील यांनी त्यांना मोबाईल वरून मुलींशी व्हिडीओ काँल करून तुम्हाला पसंत आहेत अगर कसे याबाबत नातेवाईक व मित्रांना एकमेकांसमोर व्हिडीओ काँलद्वारे मुलींची ओळख करून दिली व ज्यांना मुलगी पसंत झाली व मुलींना मुलगा पसंद पडला त्यापैकी मौजे-तारापुर ता-पंढरपुर येथील राहणारे 1) शाम दत्तात्रय शिंदे यांनी 2,00000/- रुपये तसेच 2) दिपक अनिल पाटील रा.आमराई सोलापूर यांनी त्यासाठी 40,000/- रूपये 3) दीपक भारत लोखंडे रा.अकलूज ता.माळशिरस यांनी 30,000/- रूपये 4) विठ्ठल आंगद वायकर रा.करमाळा यांची त्यासाठी 15,000/- रूपये 5) सागर टोमटे रा.नान्नज ता. उत्तर सोलापूर यांनी 1,00,000/- रूपये 6) संतोष वाले रा.सोलापूर यांनी 5000/- रूपये 7) महादेव अंकुश कांबळे रा.शिराळ ता.परांडा यांनी 60,000/- रूपये 8) योगेश दत्तात्रय कुलकर्णी रा.कामती ता.मोहोळ यांनी 15,000/- रूपये 9) दादा महाजन रा.सुरवड ता.इंदापूर यांनी 26000/- रूपये 10) आनंद प्रभाकर पांडव रा.सोलापूर यांनी 25000/- रूपये 11) आण्णा प्रभाकर पांडव रा.सोलापूर यांनी 15000/- रूपये 12) अमोल गायकवाड रा.कुर्डूवाडी ता.माढा यांनी 10000/- रूपये 13) संभाजी दरीबा सपाटे रा.नाशिक यांनी 50000/- रूपये 14) शाहरूख शेख रा.हुलजंती ता.मंगळवेढा यांनी 50000/- रूपये 15) ज्ञानेश्वर लोकरे रा.तडवळे ता.माढा यानी 25000/- रूपये असे एकुण 6,66,000/- रुपये वरील सर्वांनी त्यांचे फोन पे वरून तसेच माझे अँकाऊट नं.1) 070318210000791,2)33096794031 वरुन राज पाटील यांचे सांगणेवरून आम्ही सर्वांनी सचिन परमानंद बनसोड याचे फोन पे नंबर 9373151065 व त्यापैकी सागर अनिल जाधव यांनी त्यांनी दिलेला अकाऊंट नंबर 959649320 इंडियन बँक मध्ये 40000/- रूपये प्रमाणे रक्कम ही सर्वांनी मिळून वेगवेगळ्या तारखेला टाकली होती.
त्यानंतर राज पाटील या व्यक्तीने पहिल्यांदा महादेव कांबळे यांना साखरपूडा करिता अहमदनगर येथील मुलीसोबत दिनांक 01/12/2020 रोजी ची त्यांनी तारीख दिली.तसेच दिपक भारत लोखंडे यास सांगली येथील मुलीसोबत दिनांक 03/12/2020 रोजी तारीख दिली,सागर टोणपे यास अमरावती येथील मुलीसोबत साखरपूडा करिता दिनांक 08/12/2020 रोजी तारीख दिली व सदरचे साखरपूडे हे मुलीच्या घरी करायचे ठरविले होते.व राहिलेल्या इतर लोकांना पुढील तारीख देणार असल्याचे राज पाटील यांनी सांगितले होते.दिनांक 30/11/2020 रोजी मला राज पाटील याने त्याचे मोबाईल वरून काँल करून सांगितले की,मी सोलापूर येथे येण्यासाठी निघालो आहे.माझा मोबाईल बंद राहिल मी गाडी चालवित आहे आल्यानंतर मी तुम्हाला काँल करतो असे सांगितले होते.त्यानंतर त्यास वेळोवेळी काँल केला परंतु त्याचा मोबाईल आजपर्यंत लागला नाही.त्यामुळे खात्री झाली की दिः- 25/10/2020 रोजी पासुन ते दिनांक 30/11/2020 रोजी पर्यत मला तसेच इतर लोकांना नवरी देतो असे सांगुन बनावट कागदपत्राचे आधारे नवरी मिळे नव-याला मराठी विवाह संस्था काढुन आम्हास मुलीसोबत लग्न लावुन देतो असे सांगुन त्याकरिता पैसे द्यावे लागतील असे सांगुन पैशाची मागणी केल्याने ती मी राज पाटील यांचे सांगणेवरून सचिन परमानंद बनसोड याचे फोन पे नंबर 9373151065 व त्यापैकी सागर अनिल जाधव यांनी त्यांनी दिलेला अकाऊंट नंबर 959649320 इंडियन बँक मध्ये 40000/- रूपये प्रमाणे एकुण 6,66,000/- रुपये रक्कम फिर्यादीचे मित्र तसेच नातेवाईक यांना भरावयास सांगितल्याने त्यांनी वेळोवेळी त्यांचे फोन पे अकाऊट माझे अकाऊट वरुन भरलेली आहे.परतु राज पाटील यास वेळोवेळी काँल केला परतु त्यांचा मोबाईल फोन बंद असल्याने राज पाटील व त्याचे साथीदार यांनी बनावट नावाची महाराष्ट्र शाशन मान्यता प्राप्त नवरी मिळे नव-याला मराठी विवाह ही संस्था करुन आम्हाला पैसे भरावयास सांगुन आमची फसवणुक केल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

15 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

15 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago