महावितरणच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ प्रकरणी माजी आमदाराची तुरुंगात रवानगी

काही लोकांचे वाढीव बिल कमी करण्यासाठी माजी आमदार राजू तोडसाम आपल्या समर्थकांसह वीज वितरण कार्यालयात गेले होते, तेथील लेखापाल विलास आकोट यांच्याशी त्यांचा वाद होऊन आकोट यांना अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार आकोट यांनी दाखल केली होती. या प्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी भादंवि 294, 352, 353, 506 नुसार गुन्हा दाखल केला होता.कानिष्ठ न्यायालयाने 2015 साली माजी आमदार राजू तोडसाम यांना सुनावलेली 3 महिने कारावासाची शिक्षा आज जिल्हा सत्र न्यायालय पांढरकवडाने कायम केल्याने राजू तोडसाम यांची यवतमाळ कारागृहात रवानगी करण्यात आली.
      नागपूर उच्च न्यायालयात या शिक्षेविरोधात धाव घेणार : राजू तोडसाम
यावेळी शासनातर्फे सरकारी वकील आर. डी. मोरे यांनी तर राजू तोडसाम यांच्यातर्फे ऍड. गणेश धात्रक यांनी काम पाहिले, तर संतोष राऊत हे पैरवी अधिकारी म्हणून उपस्थित होते. उद्या आपण नागपूर उच्च न्यायालयात या शिक्षेविरोधात धाव घेणार असल्याचे माजी आमदार राजू तोडसाम यांनी सांगितले. सदर शिक्षेमुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago