वाखरी ग्रामपंचातीच्या निवडणूकीत ८० टक्के मतदान

पंढरपूर तालुक्यातील वाखरी ग्रामपंचायत निवडणूक दि १५ जानेवारीला खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असुन ४८१४ मतदारांपैकी ३८८७ मतदारांनी आपला हक्क बजावला. एकुण ८०.७४ टक्के मतदान झाले असून यामध्ये तरुणाईचा ऊत्साह दिसुन आला. वाढलेले तरुणाईचे मतदान कोणत्या गटाच्या पदरात पडणार हे निकालादिवशीच समजणार असुन शांततेत मतप्रक्रिया पार पाडण्यास दोन्ही गटाकडुन सहकार्य मिळाले.
प्रभाग क्र ०१ मध्ये ६३९पैकी ५०२ , प्रभाग क्र ०२ मध्ये ९६८पैकी ८२९, प्रभाग क्र ०३ ७७७ पैकी ६५०, प्रभाग क्र ०४ मध्ये ६६७ पैकी ५७०, प्रभाग क्र ०५ मध्ये ७६० पैकी ५७६ , प्रभाग क्र ०६ मध्ये १००३ पैकी ७६० इतके मतदान झाले असुन प्रभाग क्र ०२ मधील आकडेवारी सर्वाधिक आहे. युवकांची वाढलेली टक्केवारी वाखरीच्या राजकारणाची गणिते ठरवणार असल्याची चर्चा निवडणूकीनंतर चालु झाली आहे. एकंदरीत या टक्केवारी वरुन मतदार राजा ऊत्साही असुन जागरुक व सुशिक्षित नागरिक असल्याचे ग्रामस्थांनी दाखवुन दिले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

16 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago