सोलापूर जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी संपर्क प्रमुख आ.डॉ.तानाजी सावंत यांना अधिक सक्रिय होण्याचे आदेश द्या

शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांनी गेल्या महायुतिच्या सत्ताकाळात सोलापूर जिल्ह्यात शिवसेना अधिक मजबूत झाल्याचे दिसून आले. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी व सामान्य शिवसैनिक हे थेट आ.डॉ. तानाजीराव यांच्याशी सम्पर्क करून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिक सक्षमतेने कार्यरत असल्याचे दिसून आले होते.जिल्ह्यात शिवसेनेचा झंजावात होता. मात्र गेल्या वर्षभरापासून जिल्हा शिवसेनेत मरगळ आल्याचे दिसून येत आहे.येऊ घातलेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता यात यश प्राप्त करण्यासाठी शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांना पक्षवाढीसाठी अधिक सक्रिय होण्याचे आदेश दयावेत अशी मागणी पंढरपुर विभाग व पंढरपूर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.   
   सोलापूर जिल्ह्यात शिवसेना वाढली पाहिजे यासाठी प्रचंड तळमळ असलेले नेतृत्व म्हणून जिल्हा शिवसेना संपर्क आ.तानाजी सावंत यांनी अतिशय भूमिका पार पाडली आहे.शिवसैनिकामध्ये कुठलाही भेदभाव न करता एक आक्रमक व शिस्तप्रिय नेतृत्व म्हणून त्यांनी काम केले आहे.त्यामुळे त्यांना पुन्हा सक्रिय होण्यासाठी आदेश द्यावेत अशी मागणी या निवेदनात केली आहे. या निवेदनावर शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे,माजी जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव,शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख शैला गोडसे,शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव,शिवसेना तालुका प्रमुख महावीर देशमुख,शहर प्रमुख रवी मुळे यांच्या सह्या आहेत.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये व्याख्यान..

संघर्षातून यशाकडे’ व्याख्यानातून विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र. पंढरपूर : श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांच्या सहाव्या…

3 weeks ago