उधारीच्या पैशाची मागणी केल्यामुळे पानटपरी चालकास बेदम मारहाण

      पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील पानटपरी चालक सचिन भारत व्यवहारे  यानी उधारीची मागणी केल्याने अतुल दत्तात्रय गायकवाड व विजय विठ्टल गायकवाड रा. तुंगत यांनी काठीने बेदम मारहाण केली असल्याची फिर्याद सदर पानटपरी चालकाने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
       या बाबत दाखल फिर्यादी नुसार तुंगत येथील पानटपरी चालक सचिन भारत व्यवहारे हे दि.09/01/2021 रोजी रात्री 09.00 वा. चे सुमारास पानटपरी जवळ उभा असताना गावातील अतुल दत्तात्रय गायकवाड व विजय विठ्टल गायकवाड हे दोघे पानटपरी जवळ आले.त्यावेळी त्यांच्याकडे उधारीचे पैसे देण्याची मागणी केली असता पानटपरी मागे जावून त्याठिकाणी पडलेली लाकडी काठी अतुल गायकवाड याने घेवून शिवीगाळी करत हातातील लाकडी काठीने पाठीवर ,डावे हाताचे दंडावर मारहाण करून जखमी केले तर सोबत असलेल्या विजय गायकवाड याने देखिल शिवीगाळी करत तोंडावर हाताने ,बुक्याने मारून खाली पडलेला दगड हातात घेवून माझे पाटीवर मारून जखमी केले.यावेळी फिर्यादीचे वडील भारत नरहरि व्यवहारे हे सोडवा सोडव करत असताना त्यांना देखिल वरिल दोघांनी शिवीगाळी दमदाटी केली अशा आशयाची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

3 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago