राज्याबरोबरबच पंढरपूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोठी चुरस पहावयास मिळत असतानाच पंढरपूर तालुक्यात गावपातळीवरील आघाडीच्या माध्यमातून निवडणूका लढल्या जात आहेत.यात शिवसेनेचे अनेक उमेदवार मैदानात उतरवले असून समविचारी आघाडीसोबत हे उमेदवार निवडणूक लढवीत आहेत अशी माहिती शिवसेनेचे तालुका प्रमुख महावीर देशमुख यांनी दिली.वाखरी येथे शिवसेनेचे संजय अभंगराव व सर्जेराव पांढरे हे दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाले असून माध्यमातून शिवसेनेने ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी सलामी दिली आहे.या निवडणुकांमध्ये शिवसेनेचे अनेक उमेदवार विजयी होतील असा विश्वास यावेळी महावीर देशमुख यांनी व्यक्त केला.
वाखरी ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध विजयी झालेले जेष्ठ शिवसैनिक संजय अभंगराव व सर्जेराव पांढरे यांचा पंढरपूर तालुका शिवसेनेच्या वतीने हार्दिक सत्कार करण्यात आला.यावेळी उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव,शहर प्रमुख रवींद्र मुळे,युवा सेना शहर प्रमुख महावीर अभंगराव,उपशहर प्रमुख पोपटनाना सावंतराव,उपशहर प्रमुख लंकेश बुराडे,अविनाश वाळके यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…