ताज्याघडामोडी

सिताराम महाराज साखर कारखान्याचा पहिला हप्ता प्रती मे.टन.2000/- प्रमाणे बँकेत जमा – कार्यकारी संचालक समाधान काळे

सिताराम महाराज साखर कारखान्याचा पहिला हप्ता प्रती मे.टन.2000/- प्रमाणे बँकेत जमा – कार्यकारी संचालक समाधान काळे
पंढरपूर – सीताराम महाराज साखर कारखाना खर्डी चालु गळीत हंगाम 2020-2021 हा सुरु झालेला असून ज्या ऊस उत्पादक   शेतकऱ्यांनी  दि.16/12/2020 ते दि.31/12/2020 या पंधरवड्यामध्ये ऊस पुरवठा केला आहे त्या ऊस बीलाचा पहिला हप्ता प्रति मे.टन.2000/- रुपये प्रमाणे निशिगंधा सहकारी बँक शाखा पंढरपूर येथे जमा केलेला आहे.
तसेच चालु गळीत हंगामात आमचे कारखान्याकडे बिगर अॅडव्हान्स ऊस तोडणी वाहतुक करणाऱ्या वाहतुक कंत्राटदार यांना वाहतुक बिलावर 30 % व तोडणी बिलावर 19 % प्रमाणे कमिशन बिले विना कपात दररोज ऊसाची खेप झालेनंतर चेकने कारखाना साईटवर अदा केलेली आहे. तरी शेती विभागातील चिटबॉय यांचेकडून ऊस बिल पावती मिळाल्यानंतर आपली बिले घेण्यासाठी निशिगंधा सह.बँक लि,पंढरपूर यांचेकडे बँकेच्या सुट्या  व्यतिरिक्त बँकेतून कारखान्याचे चिटबॉय यांचेकडून बिल पावती घेऊन बिले घेऊन जावीत. बँकेत खाते नसणाऱ्या  शेतकऱ्यांनी खाते उघडुन बिले घ्यावित त्यासाठी केवायसी कागदपत्रे घेऊन बँकेत जावे. कारखान्याचे ऊस पुरवठा सभासदांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्यास गाळपास देवुन सहकार्य करावे असे कार्यकारी संचालक समाधानदादा काळे यांनी सांगीतले.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चा ९२%निकाल

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…

2 weeks ago

१९ एप्रिल रोजी शिवस्वराज्य पंढरीरत्न राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…

3 weeks ago

मा.आ.प्रशांत परिचारक यांना विधान परिषद नाही तर विधानसभेचे आमदार करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ आग्रही ?

सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर  परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…

3 weeks ago

भावनिक क्षणांत रंगला सिंहगडमध्ये अंतिम वर्षाचा निरोप समारंभ

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये निर्भया पथकाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…

1 month ago

कर्मयोगी विद्यानिकेतनचे अभिमानास्पद यश!

पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…

1 month ago