राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्यावरील खोटा गुन्हा त्वरित मागे घ्या

              महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेसचे अध्यक्ष महबूब शेख यांच्या विरोधात औरंगाबाद येथील एका महिलेने खोटा गुन्हा दाखल केला आहे.वास्तविक पाहता ज्या दिवशी गुन्हा घडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे त्या दिवशी अध्यक्ष महबूब शेख हे मुबंईत होते हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे.सदर महिलेने दाखल केलेली फिर्याद हि खोटी असल्याचे दिसून येत असून या मागे राजकीय षड्यंत्र आहे.एका सामान्य कुटूंबातून पुढे आलेल्या युवकाने आपल्या संघटन कौशल्याच्या बळावरच प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत मजल मारलेली असताना महबूब शेख याना बदनाम करण्याचा डाव आहे.त्यामुळे सदर गुन्हा त्वरित मागे घ्यावा अशा आशयाचे निवदेन राष्ट्रवादी कॉग्रेस अल्पसंख्याक युवक विभागाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर यांना दिले आहे.

              यावेळी पंढरपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुधीर भोसले.अल्पसंख्यांक विभाग मा.शहराध्यक्ष रशीद शेख,शहर उपाध्यक्ष सचिन कदम,शहर उपाध्यक्ष गिरीश चाकोते, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक युवक विभागाचे अध्यक्ष शाहरुख मुलाणी आदी उपस्थित होते.    या बाबत बोलताना राष्ट्रवादी अल्पसंख्यांक युवक विभागाचे अध्यक्ष शाहरुख मुलाणी यांनी प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्यावरील गुन्हा त्वरित मागे घेण्यात यावा अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

23 minutes ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago