स्व.आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनाचा धक्का पचविणे जसे त्यांच्या समर्थकांना जड गेले तसेच व्यंकटराव भालके यांनाही प्रचंड मोठा धक्का बसला होता.एवढेच काय तर स्व.आमदार भारत भालके यांना पुन्हा रुबी हॉल क्लिनिक मध्ये उपचारासाठी दाखल केल्यानंतर व त्यांची प्रकृती अतिशय खालावल्या नंतर हि माहिती त्यांच्या पर्यंत पोहोचू नये याची व्यवस्था करण्यात आल्याची चर्चा असून व्यंकटराव भालके यांना हा धक्का सहन होणार नाही हीच त्यामागचे कारण होते.
मात्र आता स्व.आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर व्यंकटराव भालके हे सावरले असल्याचे दिसून येत असून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी भगीरथ भालके यांची निवड झाल्यानंतर आता आगामी पोटनिवडणुकीत भगीरथ भालके हे आमदार झाले पाहिजेत यासाठी पुन्हा मिशन मोडवर आले असून जोरदार व्युव्हरचना करताना दिसून येत आहेत.सध्या दोन्ही तालुक्यात ग्राम पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून यात जास्तीत जास्त ग्रामपंचातीवर स्व.आमदार भारत भालके गटाचा व विठ्ठल परिवाराचा ताबा राहिला पाहिजे यासाठी त्यांनी २००७ ते २००९ प्रमाणे पुन्हा एकदा पायाला भिंगरी बांधत दोन्ही तालुके पिंजून काढण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे.सर्व सामान्य जनता आणि सर्व सामान्य कार्यकर्ते,समर्थक याना सन्मान देण्याची स्व.आमदार भारत भालके यांची कायर्पद्धती त्यांनी आतापर्यंत अंगिकारली असल्याने पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात पुढील महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका व एप्रिल किंवा मे महिन्यात होणारी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूकी मध्ये व्यंकटराव भालके हे नक्कीच संकटमोचक ठरतील असा विश्वास स्व.आमदार भारत भालके सर्मथकांकडून व्यक्त केला जात आहे.