राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज स्व.भारत भालके यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी सरकोली ता.पंढरपूर येथे आले असता त्यांनी भालके परिवाराची भेट घेऊन त्यांना धीर दिला.खा.शरद पवार यांच्या या भेटीमुळे पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील स्व.आ.भारत भालके समर्थकांना मोठा दिलासा मिळाला असून स्व.आ.भारतनाना ज्या पवार साहेबांना आपले दैवत मानत होते साक्षात तेच शरद पवार त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटूंबास धीर आणि आधार देण्यास आल्यामुळे या भारतनाना प्रेमींमध्ये मोठा उत्साह संचारला होता.यावेळी जनसमुदाया समोर बोलताना विठ्ठल परिवाराचे नेते म्हणून कल्याणराव काळे यांनी स्व.भारतनानांच्या आठवणी जागवताना आर्थिक संकटात सापडलेल्या या तालुक्यातील तिन्ही साखर कारखान्यांना सरकारचे बळ मिळावे यासाठी केलेल्या पाठपुराव्याची आठवण जागवतानाच खा. शरद पवार यांनी केलेल्या मार्गदर्शन आणि सहकार्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला व यापुढे शरद पवार सांगतील त्या पद्दतीने काम करू असे सांगितले.त्यांच्या या विधानामुळे कल्याणराव काळे हे लवकरच भाजपा सोडून राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये प्रवेश करतील अशी चर्चा पंढरपूर तालुक्यात सुरु झाली आहे.
पंढरपूर : प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
पंढरपूर | प्रतिनिधी एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे मंगळवार, दि. १०…
तंत्रज्ञानाच्या कुंभमेळ्यात कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांचे यश नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय तंत्रज्ञान व प्रकल्प प्रदर्शनामध्ये कर्मयोगी इन्स्टिट्यूट…
वसंत देशमुख-प्रमोद देशमुख यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष मागील महिन्यात पार पडलेल्या सोलापूर जिल्हा परिषद -तालुका…
इंटर इंजिनियरिंग डिप्लोमा स्टूडेंट स्पोर्ट असोसिएट यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेमध्ये कर्मयोगी…
पंढपूर सिंहगड महाविद्यालयातील यांत्रिकी विभागामध्ये यांत्रिकी अभियांत्रिकी विभाग आणि इंडियन सोसायटी फॉर नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग क्लब…