ताज्याघडामोडी

स्वेरीत कोरोनामुक्ती अभियान संपन्न

     पंढरपूर- जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत असलेल्या पंचायत समिती, पंढरपूर आणि श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीमध्ये एकदिवसीय ‘कोरोनामुक्ती अभियाना’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वेरी अंतर्गत असलेल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व कॉलेज ऑफ फार्मसीच्या पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवी मधील सर्व सदस्यांची कोविड -१९ ची तपासणी करण्यात आली.

         या कोरोनामुक्त अभियानाचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (आयएएस) यांच्या हस्ते व श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूरचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे , संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे यांच्या उपस्थितीत पार पडले. स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या जवळपास तीनशे स्टाफची कोविड-१९ ची तपासणी करण्यात आली. स्वेरीमध्ये असलेली सुरक्षितता, दोन स्टाफमध्ये सुरक्षित अंतर, मास्क व सेनिटायझर याचा वारंवार वापर व आरोग्याच्या दृष्टीने काटेकोरपणे पालन केले जात असल्याचे दिसून आले. हे अभियान पंढरपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले व वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. भाऊसाहेब जानकर, डॉ.अभिजीत रेपाळ, डॉ.श्रीकांत नवात्रे, डॉ.प्रभा साखरे, डॉ. अनिसा तांबोळी, डॉ. गुंजाळ, डॉ. शिरीष पाटील, डॉ.बब्रुवान माने, प्रशांत घोडके, तानाजी मल्लाव, राजू सय्यद, दीपक चव्हाण, सरिता राठोड, संगीता जाधव, तालुका अभियान व्यवस्थापक बचत गट विभागाचे सचिन हिरेमठ, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांच्या सह एमआयटी मधील आरोग्य सेवकांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

3 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago