तुंगत पुनर्वसन गावठाणातून मोठ्या प्रमाणात अवैध मुरूम चोरी

पंढरपूर तालुक्यातील मौजे तुंगत पुनर्वसन गावठाणातील मुरूम काही अज्ञात लोकांकडून सातत्याने टिपर व जेसीबीच्या वापर करून चोरून नेला जात आहे.त्या मुळे या पुनर्वसन गावठाणाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.सदर गावठाण हे मुख्य वाहतुकीच्या रस्त्याच्या कडेला असून त्यामुळे येथील नागिरकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
           सदर मुरूम चोरीमागे काही धनदांडग्यांचा हात असल्याची चर्चा असून या मुरूम चोरीमुळे शासनाचे लाखो रुपयांच्या महसुलाचे नुकसान होत आहे.त्यामुळे सदर पुनर्वसन गावठाणाच्या हद्दीतील अवैध मुरूम उपसा थांबवावा व या प्रकरणी अधिक चौकशी करून मुरूम चोरी करणाऱ्यांची वाहने जप्त करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनसेवा प्रतिष्ठानने पंढरपूर प्रांताधिकारी कार्यालयाकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.या प्रकरणी तात्काळ कारवाई न झाल्यास येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे.
      हे निवेदन देताना जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत माने,नारायण भुई,महादेव फराटे,नाथाजी पिलवे,मयूर माने,कल्याण लेंडवे आदी उपस्थित होते.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

4 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago