ताज्याघडामोडी

पटवर्धन कुरोली येथून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर करकंब पोलिसांची कारवाई

    पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून करकंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील याना  मिळाली असता त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार पो.हे.कॉ. हरीहर,पो.ना.जाधव यांच्यासह सदर प्रकरणातील फिर्यादी पो.ना.दादासाहेब भिमा सुळ हे पटवर्धन कुरोली देवडे या रस्त्यावरून अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन जाणार असल्याची खबर मिळताच दोन पंच सोबत घेऊन पहाटे ५ वाजता देवडे रोड चिंचकर वस्ती पटवर्धन कुरोली येथे गेले असता समोरुन एक डंपिंग ट्रेलर येत असताना दिसला. चालकास थांबण्याचा इशारा केला. ट्रँक्टर थांबल्यानंतर बँटरीचे उजेडात पाहीले असता डंपिंगमध्ये वाळु मिळुन आली.
          सदर प्रकरणी केलेल्या कारवाईत एक निळ्या रंगाचा New Holland कंपनीचा बिगर नंबरचा ट्रँक्टर व त्यास पाठीमागे पिवळ्या रंगाची डंपिंग ट्रॉली,एक ब्रास वाळु असा अंदाजे 3 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.या प्रकरणी समाधान बाळासाहेब नाईकनवरे वय 21 वर्षे 2) महादेव कृष्णा खेडेकर दोघे रा. पटवर्धन कुरोली ता.पंढरपूर यांच्या विरोधात भा.द.वि.सं कलम 379, 34 सह गौण खनिज सुधारीत अधि. 2015 चे कलम 4(1), 4(क)(1), 21 अन्वये पोलीस नाईक दादासाहेब सूळ यांनी दाखल केली आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

8 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago