ताज्याघडामोडी

पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात पंढरपुरात पेट्रोल पंपासमोर शिवसेनेचे बोंबाबोंब आंदोलन

        गेल्या महिनाभरापासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे सातत्याने वाढत चालले असून पेट्रोलच्या दराने नव्वदी पार केली आहे.तर काही ठिकाणी डिझेल आणि पेट्रोल एकाच दराने मिळत आहे.इंधनाचे दर वाढल्यामुळे सर्वत्र महागाईचा भडका उडणार असून कोरोनामुळे आधीच सर्वसामान्य जनतेचे जगणे मुशिक्ल असताना मोदी सरकार सामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळत आहे.अशी भावना व्यक्त करीत आज पंढरपूर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने येथील गोपाळपूर रोड येथील पेट्रोल पंपासमोर बोंबाबोंब आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध केला.
            या बाबत अधिक माहिती देताना शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे म्हणाले कि,केंद्र सरकार हे केवळ कार्पोरेट उद्योगपती आणि आंतराष्ट्रीय बडे गुंतवणूकदार यांचे हित डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेत आहे आणि यात सर्वसामान्य जनता मात्र भरडून निघत आहे.तेल कंपन्या ज्या दराने क्रूड ऑइल खरेदी करत आहेत त्यावर केंद्र सरकार कररूपाने दुप्पट तिप्पट कर वसुली करत आहे.गेल्या काही दिवसात पेट्रोल डिझेल आणि गृहोपयोगी गॅसच्या दरात प्रचंड वाढ केली आहे.हि बाब सामान्य लोकांचे जगणे मुश्किल करणारी आहे.मात्र या बाबत न बोलता भाजपचे केंद्रीय मंत्री शेतकरी आणि सामान्य नागिरक यांच्याबाबत अवमानकारक व्यक्तव्ये करत आहेत.केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी तर कहरच केला असून आपली दानवी प्रवृत्ती दाखवलेली आहे.शेतकरी आपल्या हक्काच्या लढाईसाठी घरदार सोडून आंदोलन करीत असताना त्यांना खलिस्तानी,पाकिस्तानी समर्थक अतिरेकी संबोधने लाजिरवाणे आहे.यावेळी शिवसेनेच्या वतीने दानवे यांच्या विरोधातही घोषणाबाजी केली.
     यावेळी शिवसेना सोलापुर जिल्हा प्रमुख( पंढरपुर विभाग ) संभाजीराजे शिंदे,जयवंत माने,शिवसेना पंढरपुर तालुका प्रमुख  महावीर नाना देशमुख,शिवसेना पंढरपुर शहर प्रमुख रविंद्र मुळे, शिवसेना उपशहर प्रमुख .लंकेश बुराडे, विनय वनारे, मा. सचिन बंदपट्टे, बाबा अभंगराव,अवि वाळके, युवासेना शहर समन्वयक अमित ( पिंटू ) गायकवाड,युवा सेना शहर प्रमुख मा. महावीर अभंगराव,शिवसेना विभाग प्रमुख पंकज डांगे-कोळी, अरुण कांबळे,  ईश्वर सालुंखे, गणेश वाघमारे, राघवेंद्र ऐनापुरे,शाखा प्रमुख विजय गंगणे,पिंटू रेड्डी,प्रणित पवार, सौरव चौगुले,प्रदीप बडवे, अपंगसेना शहर अध्यक्ष शिवाजीराजे कोष्टी, अमित अभंगराव, गणेश पवार, बसवेश्वर अभंगराव, अजय अभंगराव, बंटी यवनकर, सीताराम माने ( तावशी ), गणेश घंटे, मारू धोत्रे, विट्ठल शिंगाडे, रवि शिंगाडे, रणजीत बंदपट्टे, प्रतापसिंह पवार, जितेंद्र ठाकुर, अक्षय गायकवाड, बाजी घाडगे, अजय हुलवडे, स्वप्निल शिंगाडे, सुजीत डोंबे, स्वप्निल शिंदे, सौरव नागटिळक, विशाल पाटोळे, अमितकुमार जमदाडे, अमित मुळे, छोटू ठाकुर, गणेश मुळे तसेच बहुसंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

4 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

4 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago