केंद्र सरकारने नुकताच आयुर्वेदिक डॉक्टरांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्याच्या निर्णय घेतला असून त्यामुळे देशभरातील अलोपॅथिक डॉक्टर संतप्त झाले आहेत. केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने (आय एम ए) राष्ट्रीय पातळीवर आंदोलन सुरु केले असतानाच या आंदोलनात महाराष्ट्रातील आय.एम.ए.च्या 219 शाखांमधील 45000 डॉक्टरांसह महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणीकृत असलेले एकूण 1 लाख दहा हजार डॉक्टर्स सहभागी होणार आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयास विरोध दर्शविण्यासाठी ईएमए शी संलग्न असलेले सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत बंद राहणार असून मात्र तातडीने सेवा सुरु राहतील. यात आय.सी.यु., अपघातात सापडलेल्या रुग्णासाठी असलेली अत्यावश्यक सेवा, प्रसूतीसेवा यांचा समावेश आहे.
याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष, डॉ अविनाश भोंडवे सांगतात की, “आयुर्वेद विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणात 58 एलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. आयएमएने या विरोधात 11 डिसेंबर रोजी देशव्यापी बंद पुकारला आहे. आयएमएचा हा लढा आयुर्वेदाविरोधी नाही. किंवा आयुर्वेदाच्या वैद्यांविरोधीसुद्धा नाही. आमचा विरोध वैद्यकीय शाखांची सरमिसळ करून बनवल्या जाणाऱ्या ‘मिक्सोपथी’ विरोधी आहे. या बंदमध्ये रुग्णांना कोणताही त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. सर्व तातडीने सेवा सुरु राहणार आहेत, मात्र सरकार ज्यापद्धतीने दोन पॅथींची सरमिसळ करत आहे त्याच्या विरोधात हा बंद पुकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…