कोरोनाचा धोका असल्याने यंदा चैत्यभूमीवर गर्दी करू नका – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

कोरोनाचा धोका असल्याने यंदा चैत्यभूमीवर गर्दी करू नका – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकरी जनतेला आवाहन

कोरोना हा संसर्गजन्य रोग असून या महामारिचा धोका अजून कमी झाला नसल्यामुळे यंदा 6 डिसेंबर ला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी वर गर्दी करू नका.या वर्षी घरी राहूनच आपल्या प्राणप्रिय मुक्तीदाते ; महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आंबेडकरी जनतेला केले आहे. मागील 8 महिन्यापासून कोरोना चा धोका जगात वाढत राहिला आहे. आता त्याचे प्रमाण कमी वाटत असले तरी धोका कायम आहे.                                        कोरोनाचे संकट जीवघेणे आहे. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.कोरोना चा धोका वाढत असताना गर्दी करण्याचे दिवस नाहीत.त्यामुळे चैत्यभूमीवर होणारी गर्दी यावर्षी टाळली पाहिजे. यावर्षी गणेशोत्सव ; नवरात्रोत्सव; ईद ; दिवाळी सर्व सण गर्दी न करता साजरे झाले. त्यामुळे यंदा चैत्यभूमी वर गर्दी न करता घरी राहून ; आपल्या गावात ; महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला ; पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करावे.यावेळी सुरक्षित अंतर आणि मास्क चा वापर करावा आणि यंदा 6 डिसेंबर ला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी गर्दी न करता अभिवादन करावे असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

6 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

2 weeks ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago