…तर शेतकऱ्यांसाठी देश पेटवून सोडल्याशिवाय राहणार नाही – राजू शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटना या कृषी कायद्याविरोधात आक्रमक
यावेळी पुतळा दहन करण्यासाठी पोलिसांकडून आंदोलकांची अडवणूक करण्यात आली. मात्र आमची अडवणूक झाली असली तरी आमचा उद्देश आम्ही साध्य केलाय, असं राजू शेट्टी यांनी सांगितलं “शेतकऱ्याला खलिस्तानी म्हणणारे अमित शहा कोण लागून गेले”, अशी घणाघाती टीका राजू शेट्टी यांनी अमित शहा यांच्यावर केली आहे.शेतकरी आंदोलन दडपण्यासाठी जातीवादाचं ठेवणीतलं अस्त्र केंद्र सरकारनं बाहेर काढलं असा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय.याबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाले, “लोकशाहीचे संकेत धाब्यावर बसून घाईघाईने केंद्र सरकारने कृषी विधेयकं मंजूर केली. शेतकऱ्यांची पसंती नसतानाही ही विधेयक मंजुर करण्यात आली. कॉर्पोरेट कंपन्या, उद्योजक यांच्या घशात शेती व्यवसाय घालण्याचा केंद्र सरकारचा हा डाव आहे. त्यामुळे शेती वाचवा आणि आम्हाला वाचवा अशी मागणी शेतकरी वर्ग करतो आहे. शेतकर्यांना सन्मानाने शेतीव्यवसाय करू देणं, हमीभावाचा कायदेशीर अधिकार शेतकऱ्यांना मिळायला हवा या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…