फटाक्यांच्या खर्चाला फाटा देऊन ज्येष्ठांना दिल्या भेटवस्तू.. पंढरपूरच्या सोनार बंधूंचा स्तुत्य उपक्रम…

फटाक्यांच्या खर्चाला फाटा देऊन ज्येष्ठांना दिल्या भेटवस्तू..

पंढरपूरच्या सोनार बंधूंचा स्तुत्य उपक्रम…
पंढरपूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य शासनाच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून पंढरपूर येथील साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते रवि वसंत सोनार यांच्या परिवारामधील मुलांनी व तरुणांनी फटाक्यांचा खर्च कमी करण्यासाठी संकल्प केला आहे.
         याकामी कुमारी रेवती, ओंकार, गौरव आणि अथर्व या सोनार बांधवांनी पुढाकार घेतला. तसेच फटाक्यांसाठी होणाऱ्या खर्चाची रक्कम सामाजिक कार्यासाठी उपयोगात आणण्याचे ठरवले. यासाठीच सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी म्हणून सोनार बांधवांनी गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या दीपावली साठी उपयुक्त असे सुगंधी उटणे, मेण पणती, सुगंधी तेल, अंगाचा साबण, मेंदी, नख पॉलिश या व अशा वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना दीपावली साठी उपयोगी वस्तू मातोश्री वृद्धाश्रमाचे समन्वयक धनंजय राक्षे आणि ज्येष्ठ स्त्री-पुरुष यांच्याकडे सुपूर्द केल्या. सोनार बंधूंच्या या उपक्रमामुळे वृद्धाश्रमातील सर्वच ज्येष्ठ स्त्री आणि पुरुष आनंदीत होऊन भारावून गेले.
        या स्तुत्य उपक्रमासाठी सोनार बंधूंना श्री. व सौ. सविता रवि सोनार तसेच कवी सचिन कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. सोनार बंधूंच्या या उपक्रमाचे पंढरपूर शहर आणि परिसरात कौतुक होत आहे
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

12 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago