कायम विना अनुदानित काळातील सेवा सर्व लाभासाठी ग्राह्य धरावी-मा आ दत्तात्रय सावंत

कायम विना अनुदानित काळातील सेवा सर्व लाभासाठी ग्राह्य धरावी-मा.आ.दत्तात्रय सावंत

राज्यातील कायम विना अनुदानित शाळेचा मान्यतेच्या आदेशातील कायम शब्द काढल्याने ती शाळा विना अनुदानित झाली आहेत्या शाळेतील शिक्षकांची मान्यतेपासून सेवा सर्व लाभासाठी ग्राह्य धरून त्यांना वरीष्ठ वेतन श्रेणीनिवड श्रेणी देण्यासाठी शासनाने तात्काळ आदेश काढावा अशी मागणी पुणे विभागाचे मा आमदार दत्तात्रय सावंत यांनी केली.

        शासनाने २० जुलै२००९ रोजी इंग्रजी माध्यमाच्या शाळा वगळून इतर कायम विना अनुदानित शाळा व तुकड्यांचा कायम शब्द काढून त्यांना अनुदान सुरू केले होते. राज्यामध्ये २००१ पासून जरी शाळांना कायम विना अनुदान तत्वावर मान्यता देण्याचे धोरण निश्चित केले असले तरी १९९७ पासून काही शाळांना कायम विना अनुदान तत्वावर मान्यता देण्यात आली होतीत्या शाळेत काम करणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सन २०१२-१३पासून अनुदान देण्यात आले आहे. तर काहींना एक नोव्हेंबर २०२० पासून अनुदान सुरू होत आहे.शाळेच्या मान्यतेच्या आदेशातील कायम शब्द काढल्याने त्या प्राथमिकमाध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मान्यतेपासून विना अनुदानित शाळा झाल्या आहेतत्यामुळे नियमानुसार त्या शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवेचे लाभ मिळणे आवश्यक होतेपरंतु क्षेत्रीय अधिकारी सेवेचे लाभ  देत नव्हतेराज्यात एकसारखेपणा यावा म्हणून आ दत्तात्रय सावंत व इतर शिक्षक आमदारांनी पाठपुरावा करून शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना वारंवार भेटून शासन आदेश काढण्याची विनंती केली होती.

पुढील आठवड्यात आदेश निघेल

ज्या कायम विना अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांचा मान्यतेतील कायम शब्द काढल्याने त्यांना अनुदान देण्यात येत आहे, त्यामुळे अशा शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवेचे सर्व लाभ देण्याबाबत पुढील आठवड्यात शासन आदेश निर्गमित करण्याचे आश्वासन शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिले आहे.

मा आ दत्तात्रय सावंत

प्रदेशसचिव, महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago