राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या शहराध्यक्षापदी संगीता माने यांची निवड

 राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या शहराध्यक्षापदी संगीता माने यांची निवड

आ.भारत भालके यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान

राष्ट्रवादी कॉगे्रस महिला आघाडीच्या पंढरपूर शहराध्यक्षापदी संगीता राजेंद्र माने यांची निवड करण्यात आली आहे.या निवडीचे पत्र आ.भारत भालके यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले.
हे पत्र प्रदान करताना आ.भारत भालके म्हणाले की,राष्ट्रवादी कॉग्रेस हा सदैव महिलांनी सक्रीय राजकारणात व समाजात पुढे यावे यासाठी प्रयत्नशील राहीला असून देशाचे नेते शरद पवार यांनी महिलांच्या हाती जर स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार असेल तर त्या अधिक सक्रीयपणे राजकारणात पुढे येतील याच भावनेने 50 टक्के जागा आरक्षीत करण्याचा देशपातळीवर आदर्श ठरणारा निर्णय घेेतला होता.पंढरपूर शहर व तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेस महिला आघाडीच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्या अतिशय उत्साहवर्धक व माता भगिणींना न्याय मिळवून देणार कार्य करीत असून पंढरपूर शहर राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा म्हणून संगिताताई माने या नक्कीच शहरात राष्ट्रवादी आणखी मजबूत करतील असा आत्मविश्‍वास व्यक्त केला.
यावेळी नुतन शहराध्यक्षा संगिता माने यानी पक्षाचे ध्येयधोरणे व विचार तळागाळात पोहोचविण्याबरोबरच महिला सक्षमीकरणासाठी आणखी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले.
यावेळी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा अनिताताई नागणे, पंढरपूर तालुकाध्यक्षा अनिताताई पवार, प्राजक्ता परचंडराव, कल्याणी कोळी,सुमन माने,शालन माने आदि उपस्थित होत्या..

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago