रेल्वे पुलापासून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
तिघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पंढरपूर शहरानजीक असलेल्या चंद्रभागा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करून उपजिल्हा रुग्णलयामागील मांडव खडकी रस्त्यावरून गाढवाद्वारे वाहतूक केली जात असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांना मिळाली होती.या बाबत त्यांनी दिलेल्या आदेशानुसार सदर प्रकरणातील फिर्यादी पोलीस नाईक संदीप पाटील तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील पो.कॉ.सुर्वे,पो.कॉ.हुलजंती,पो.ना.तडवी,पो.कॉ.मुजावर हे मांडव खडकी येथे गेले असता दहा गाढवांच्या पाठीवर अवैध वाळू उपसा केलेली पोती लादून तीन इसम पाठीमागे येत असल्याचे दिसले.पोलीस आल्याचे पाह्ताच सदर तिघेही इसम पळून गेले.सदर प्रकरणातील अवैध रित्या उपसा केलेली वाळू व वाळू उपसा करण्याचे साहित्य या कारवाईत ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणी विशाल नेमाडे,संतोष जाधव यासह एका अज्ञात इसमावर भा.दं.वि. कलम ३७९,३४ व गौण खनिज कायदा कलम ४(१)४(क),२१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…