स्वेरीकडून येत्या १६ सप्टेंबर पासून एमएचटी-सीईटी परीक्षा २०२० साठी मोफत ऑनलाईन वर्ग सुरु

स्वेरीकडून येत्या १६ सप्टेंबर पासून एमएचटी-सीईटी परीक्षा २०२० साठी मोफत ऑनलाईन वर्ग सुरु

स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांची माहिती

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँन्ड रिसर्च इन्स्टिटयुट,पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगकडून ‘एमएचटी-सीईटी २०२०’  या परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने येत्या बुधवार, दि. १६ सप्टेंबर पासून ते ०५ आक्टोंबर २०२० या वीस दिवसाच्या कालावधीत मोफत ऑनलाईन सराव वर्गांचे आयोजन करण्यात आलेले असून या ऑनलाईन सराव वर्गांचा लाभ सायन्समधून बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी घेवू शकतात.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली.

          कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमएचटी-सीइटी २०२० ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. दि. ९ सप्टेंबर २०२० ला आलेल्या सीईटी सेलच्या परिपत्रकानुसार सदर परीक्षा आता १ ऑक्टोबर २०२० ते २० ऑक्टोबर २०२० या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा नाहक वाया जाणारा वेळ लक्षात घेता येत्या बुधवार, दि. १६ सप्टेंबर पासून ते दि.०५ ऑक्टोबर २०२० पर्यंत स्वेरीने एमएचटी-सीइटी २०२० ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन वर्गांचे आयोजन केलेले आहे. यामध्ये फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथ्स या विषयावर स्वेरीतील तज्ञ प्राध्यापक मार्गदर्शन करणार आहेत. या सराव वर्गासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच प्रत्येक दिवसाच्या व विषयांच्या लेक्चर्सच्या लिंक्स विद्यार्थ्यांना त्या त्या दिवशी सकाळी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना आपल्या शंका विचारण्याचीही सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी सायन्स शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी या मोफत ऑनलाईन वर्गांचा फायदा घ्यावा असे आवाहन अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी यांनी केले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी प्रा. उतम अनुसे- ९१६८६५५३६५ व ८९२९१००६१४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील केले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 day ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

6 days ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

6 days ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

7 days ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

1 week ago