एमएचटी-सीईटी २०२० ही परीक्षा दि. ०१ ते २० ऑक्टोबर २०२० दरम्यान होणार

एमएचटी-सीईटी २०२० ही परीक्षा दि. ०१ ते २० ऑक्टोबर २०२० दरम्यान होणार
पंढरपूर- सायन्स शाखेतून  बारावी उत्तीर्ण झालेल्या राज्यभरातील विद्यार्थ्यांचे संपूर्ण लक्ष आता अभियांत्रिकी व फार्मसीच्या प्रवेश प्रक्रियेकडे लागले आहे. कोरोना महामारीचा वाढता प्रसार पाहता शैक्षणिक वर्ष सन २०२०-२१ करीताची सीईटी प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. सीईटी सेल कडून दि. ०९ सप्टेंबर २०२० रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार  ‘एमएचटी-सीइटी २०२०’ ही परीक्षा दि. ०१ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२० या कालावधीत पीसीएम व पीसीबी या दोन गटात खाली दिलेल्या तारखांना स्वतंत्रपणे घेतली जाणार असल्याचे कळविले आहे. पीसीबीच्या विद्यार्थ्यांकरीता दि.०१,०२, ०४, ०५,०६,०७,०८,०९ ऑक्टोबर २०२० असे आठ दिवस परीक्षा असणार आहे तर पीसीएम ग्रुप असणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता दि. १२,१३,१४,१५,१६, १९ व २० ऑक्टोबर २०२० असे सात दिवस परीक्षा असणार आहे. सदर परिक्षेबद्दल वेळोवेळी प्राप्त होणारी माहिती विद्यार्थ्यांना कळवण्यात येईल. अधिक माहितीसाठी www.mahacet.org या वेबसाईटला भेट द्यावी तसेच प्रा.उत्तम अनुसे (मोबाईल नंबर – ९१६८६५५३६५)  यांना संपर्क साधावा असे आवाहन स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी यांनी केले आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago