कर्मयोगी पॉलिटेक्निक शेळवे येथे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या डिप्लोमा इंजिनिअरींग प्रवेशासाठी फॅसिलिटेशन सेंटर मार्फत केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश नोंदणी सुरु
श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित मौजे शेळवे येथे सुरु असलेल्या कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेज (डिप्लोमा इंजिनिअरींग) ची प्रथम व थेट व्दितीय वर्षांची प्रवेश नोंदणी प्रक्रिया दि.१० सप्टेंबर २०२० पासून सुरु झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांचे साठी एफ.सी. (फॅसिलिटेशन सेंटर) ची सुविधा कॉलेजमार्फत उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यात अल्पावधीतच या कॉलेजने आपले वेगळे वलय निर्माण केले असुन मध्यमवर्गीय व शेतकरी वर्गांच्या पाल्यांचे प्रवेश घेण्यासाठी पालकांची गर्दी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टसींगचे पालन करुन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे व त्यास भरघोस प्रतिसाद मिळत आहे. “कर्मयोगी पॅटर्न” या नावाने पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ.श्री ए.बी.कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यात या कॉलेजने शै.वर्ष-२००८ पासून चालू शैक्षणिक वर्षापर्यंत आपल्या प्रत्येक विभागाच्या वार्षिक रिझल्टमधून कॉलेजचा आलेख उंचावत नेला आहे. त्यामुळे कॉलेज कॅम्पस् सिलेक्शनमध्ये जिल्ह्यात पहिल्या तीन कॉलेजमध्ये समावेश आहे.
प्रथम वर्षाची प्रवेश नोंदणी प्रक्रिया ही दि.२१ सप्टेंबर २०२० रोजी सायं.५.०० वाजेपर्यंत असणार आहे. तसेच थेट द्वितीय वर्षाची प्रवेश नोंदणी प्रक्रिया ही दि.१४ सप्टेंबर २०२० रोजी सायं.५.०० वाजेपर्यंत राहणार आहे. तरी विद्यार्थ्यांना प्रवेश नोंदणी करीता थोडाच कालावधी राहिला आहे. त्यामुळे ही संधी विद्यार्थ्यांनी घालवू नये असे आवाहन पॉलिटेक्निकचे प्राचार्य, डॉ.श्री.ए.बी.कणसे यांनी केले आहे.
वरील प्रवेश नोंदणी बद्दल विद्यार्थ्यांनी फॅसिलिटेशन सेंटर येथील खाली दिलेल्या प्राध्यापकांशी संपर्क साधावयाचा आहे.
२. श्री कोरबू सर – ८८८८४८९२३५
३. श्री शेख सर – ९८६०३०५९१८
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…