रेल्वे पुलाजवळून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर पंढरपूर शहर पोलिसांची कारवाई

रेल्वे पुलाजवळून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर पंढरपूर शहर पोलिसांची कारवाई 

पंढरपूर शहरानजीक असलेल्या चंद्रभागा नदीच्या रेल्वे पुलानजीकच्या पात्रातून अवैधरित्या करण्यात येत असलेल्या वाळू उपशावर पंढरपूर शहर पोलिसांनी कारवाई केली असून या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे.
   या बाबत पो.ना.संदीप पाटील यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी दिलेल्या सुचनेनुसार व आदेशानुसार फिर्यादी पोलीस नाईक संदीप पाटील यांच्यासह पो.हे.काँ. उबाऴे,पो.ना.पवार,पो.ना. पठाण हे रेल्वे पुलाजवऴ भिमानदीचे पाञात गेले असता तेथे दोन इसम वाऴु काढत होते त्यावेऴी त्यांना वाऴु उपसा करण्याचा शासकीय परवाना आहे अगर कसे असे विचारले असता त्यांनी तो नसल्याचे सांगताच त्यांना जागीच ताब्यात घेतले ती वेऴ 15/00वा ची होती.त्या इसमास नाव पत्ता विचारता त्यांनी आपली नावे 1)प्रतापसिंह भिमसिंग परदेशी वय 49वर्ष रा जुनी पेठ पंढरपुर ता पंढरपुर 2)सुनिल उत्तम परचंडे वय 26वर्ष रा हरीदास वेस गल्ली पंढरपुर ता पंढरपुर असे असल्याचे सांगितले त्यांचे ताब्यात खालील वर्णनाचे वाऴु मिऴुन आले ती खालीलप्रमाणे.1)6,000/-रु. ठिक्यामध्ये भरलेली एक ब्रास वाळू कि.अं. —– 6,000/- रु मिळून आल्याने दोघांविरुध्द भा.दं.वि.कलम 379,34व गौण खनिज कायदा कलम 4(1)4( क)(1)21प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

10 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago