गणपती हॉस्पिटल नजीक अवैध वाळू वाहतूक करणारा पीकअप पकडला

गणपती हॉस्पिटल नजीक अवैध वाळू वाहतूक करणारा पीकअप पकडला 

दोघांविरोधात गुन्हा दाखल 

इसबावी येथून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुखाच्या पथकाने नुकतीच मोठी कारवाई केली होती.कारवाईमुळे इसबावी नजीकचा भीमा नदीचा परिसर हा अवैध वाळू उपशाचा हॉट स्पॉट असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा बळ मिळाले होते.गेल्या पाच महिण्याच्या कालावधीत अवैध वाळू उपशावर झालेल्या कारवायांची माहिती घेतली असता सर्वाधिक कारवाया या पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचे स्पष्ट होते.अशातच काल पुन्हा पंढरपुरातील एका उपनगरात पोलीस कारवाई झाली आहे.
         उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.काँ.नितीन माऴी,पो.काँ. मुजावर,पो.काँ.मोरे यांनी शनिवारी रात्री उशिरा केलेल्या कारवाईत पंढरपूर उपविभागीय पोलीस कार्यालयातील विशेष पथकाने गणपती हॉस्पिटल नजीक अवैध वाळू उपसा करून त्याची वाहतूक करणारे पीक अप वाहन अर्ध्या ब्रास वाळूसह ताब्यात घेतले या प्रकरणी नितीन निवृत्ती ननवरे व सिध्देश्वर दिगंबर वाघमोडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
  या प्रकरणी पो.कॉ. नितीन माळी यांनी सरकार सरकार पक्षाच्या वतीने भा.दं.वि.कलम 379,34व गौण खनिज कायदा कलम 4(1)4( क)(1)21प्रमाणे नुसार फिर्याद दाखल केली आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

3 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

7 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago