जिवा-सेना संघटनेच्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये दैदिप्यमान यश संपादन केलेले पंढरपूर तालुक्याचे सुपूत्र राहुल चव्हाण यांचा सत्कार
पंढरपूर (प्रतिनिधी) :- जिवा-सेना संघटनेच्या वतीने देशातील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यु.पी.एस.सी.) परीक्षेमध्ये दैदिप्यमान यश संपादन केलेले पंढरपूर तालुक्याच्या खर्डी या गावचे सुपूत्र राहुल अनिल चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. दि. 6/8/2020 रोजी खर्डी येथील राहुल चव्हाण यांच्या राहते घरी जाऊन जिवा-सेना संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष कमलाकार (माऊली) चव्हाण, पंढरपूर शहर उपाध्यक्ष संदीप गोरे, पंढरपूर शहर सचिव महेश गोरे, पंढरपूर उपकार्याध्यक्ष किरण हिल्लाळ, पंढरपूर तालुका कार्याध्यक्ष दत्तात्रय भुसे व पंढरपूर शहर संपर्क प्रमुख शुभम भोसले यांनी श्रीविठ्ठलाची मुर्ती, शाल, पेन व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला.
जिवा-सेना संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष कमलाकार (माऊली) चव्हाण यांनी राहुल चव्हाण यांच्या यशाचे कौतुक करत ग्रामीण भागातील युवकांनी अशाप्रकारे यश संपादन करणे कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त करुन राहुल चव्हाण यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष समाधान हिल्लाळ, खर्डी येथील रोहित हिल्लाळ, अप्पा वाघमारे, संतोष चव्हाण, विनायक हिल्लाळ, जिवा सेना संघटनेचे पंढरपूर शहर उपसचिव राहुल क्षिरसागर आदी उपस्थित होते.
देशातील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये खर्डी तालुका पंढरपूर येथील राहुल अनिल चव्हाण यांनी 109 वा क्रमांक मिळवून पंढरपूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आई-वडील शेतकरी असताना देखील जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी पुणे येथील वाडिया कॉलेजमध्ये विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला.
राहुल यांचे प्राथमिक शिक्षण निकमवस्ती खर्डी तर पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण सिताराम महाराज विद्यालय खर्डी आणि सातवी ते दहावी कवठेकर प्रशाला पंढरपूर येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. शेतकरी कुटुंबातील राहुल लक्ष्मण चव्हाण यांनी दुसर्या प्रयत्नात 109 वी रॅँक घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. राहुल चव्हाण यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होताना आढळत आहे.