राजगृहाची तोडफोड करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची राष्ट्रवादी व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी

राजगृहाची तोडफोड करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची राष्ट्रवादी व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी

हे तर समाज विघातक विकृत मानसिकतेचं दुष्कृत्य !

पंढरपूर – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील ऐतिहासिक असणाऱ्या व महत्वाच्या राजगृह या निवासस्थानी झालेल्या तोडफोडीच्या घटनेचा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टी यांच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. जी घटना घडलेली आहे ती निश्चितच निषेधार्ह असून हे समाज विघातक विकृत मानसिकतेचं दुष्कृत्य आहे. राज्य शासनाने घटनेची गंभीर दखल घेवून जे आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक करून कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पंढरपूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष संजय बंदपट्टे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे, शहराध्यक्ष संदिप मांडवे यांनी केली आहे.
यावेळी जिल्हा सरचिटणीस दिगंबर सुडके, जिल्हा सचिव सुरज पेंडाल, शहर उपाध्यक्ष सोमनाथ थिटे, मल्हार आर्मीचे शहराध्यक्ष संतोष बंडगर, शहर उपाध्यक्ष गिरीष चाकोते, सचिन सोलंकी, ओबीसी सेलचे शहर उपाध्यक्ष मनोज आदलिंगे, दत्ता भोसले यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याबाबत प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे म्हणाले की, घडलेली घटना ही निश्चितच निदंनीय असून जातीयवादी शक्तीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि नेहरू यांचे महत्व कधीच मान्य नव्हते व नाही. आज महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार चांगल्या पध्दतीने कोरोनासारख्या महामारीमध्ये काम करीत असताना सरकारला अडचणीत आणण्याच्या हेतूने हे कृत्य केलेले आहे. या घटनेमध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ही राज्याचे गृहमंत्री अनिलजी देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे,अशी माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

2 days ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

3 days ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

1 week ago

मंगळवेढा तालुक्यासाठी ६ कोटी ४५ लाख रुपये फळ पिक विमा मंजूर- आ समाधान आवताडे

पुनर्रचित हवामानावर आधारित फळपेत विमा योजना रब्बी हंगाम २०२३ साठी फळ पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांचा…

1 week ago

चेअरमन अभिजित पाटील यांच्या संकल्पनेतुन माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

१२ ऑक्टोबर पासून ५ दिवस कृषी,कृषी उद्योग मार्गदर्शन,प्रदर्शन,सांस्कृतिक कार्यक्रम  श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन…

2 weeks ago