विठ्ठल दर्शनास आलेल्या भाविकास मारहाण करून मोबाईल व रोख रक्कम लंपास

विठ्ठल दर्शनास आलेल्या भाविकास मारहाण करून मोबाईल व रोख रक्कम लंपास

अज्ञात चोरट्यांविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पंढरीत विठ्ठल दर्शनसाठी आलेल्या हणमंत संभाजी श्रीरामे (वय-24वर्षे),रा-कमळेवाडी ता.मुखेड जि.नांदेड या भाविकास जबरदस्तीने दुचाकीवर बसवून जबर मारहाण करीत मोबाईल,रोख रक्कम व चांदीचे ब्रेसलेट काढून घेतल्याची घटना रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गॅलॅझी हॉस्पिटल परिसरात घडली आहे.
  या बाबत हणमंत संभाजी श्रीरामे  यांनी फिर्याद दाखल केली असून गँलेक्सी हाँस्पीटलच्या पुढे पायी चालत रेल्वे स्टेशनकडे जात असताना गँलेक्सी हाँस्पीटलच्या पुढे सिमेंट रोडवर तीन अनोऴखी मोटारसाकलस्वार फिर्यादी जवळ आले आणि त्यापैकी एकाने तुझा मोबाईल दे मला फोन करायचा आहे असे म्हणालेवर माझा मोबाईल बंद आहे असे फिर्यादीने सांगितले व पुढे चालू लागला असता सदर चोरटयांनी पाठीमागुन त्यांचे मोटारसायकरवर येऊन मोटारसाकलवरुन खाली उतरुन अश्लील शिविगाळ करीत हाताने बुक्याने तोंडावर,पोटावर, बरगडीत मारहाण करु लागले त्यावेळेस तेथे रोडवर कोणीही नव्हते त्याचा फायदा घेवुन फिर्यादीस जबरदस्तीने मोटारसाकल एच.एफ. डिलक्स लाल रंगाची तिचा नंबर 2106 पुर्ण नंबर माहीत नाही.या दुचाकीवर बसवून त्या तिघांनी मिळुन ज पंढरपुर पासुन आडरानात अंदाजे 2कि.मी.तळ्याजवळ नेउन शिवीगाळी मारहाण करुन जबरजस्तीने खिशातील सँमसंग कंपनीचा ए 50एस माँडेलचा मोबाईल हँण्डसेट तसेच खिशातील रोख रक्कम व हातातील चांदीचे ब्रेसलेट काढुन घेतले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

57 minutes ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago