हद्दपारीतील आरोपीस पकडण्यासाठी गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केला थरारक पाठलाग

हद्दपारीतील आरोपीस पकडण्यासाठी गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केला थरारक पाठलाग 

सपोनि नवनाथ गायकवाड,पो.काँ. गणेश इंगोले,पो.ना.संदीप पाटील, पो. ना.हरिप्रसाद औटी यांची कामगिरी 

उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या आदेशानुसार भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता 1951 चे कलम 56 (1) (अ) (ब) अंतर्गत हद्द्पार आरोपी दत्ता काळे यास सहा महिने कालावधी करिता हद्द्पार करण्यात आले होते. सदर आदेशाची प्रत दत्ता शहात्तर काळे यास बजावणी करण्यात आली होती.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी सपोनि गायकवाड यांना फोन वरून कळविले की, हद्दपार करण्यात आलेला इसम नामे दत्ता शहात्तर काळे रा.शिंदे चौक, इसबावी,पंढरपूर हा इसबावी येथील दूध पंढरी समोर उभा असुन त्या ठिकाणी जावुन त्यास पकडून पोलीस ठाणेस आणून पुढील योग्यती कारवाई करावी.या आदेशानुसार सपोनि गायकवाड,पो.काँ. इंगोले,पो.ना.पाटील, पो. ना. औटी हे खाजगी वाहनाने इसबावी येथील दूधपंढरी समोर गेले असता हददपार इसम नामे दत्ता शहात्तर काळे हा रोडचे कडेला झाडाखाली उभा असलेला त्यांना दिसला. पोलीस असल्याची चाहूल लागताच आरोपी दत्ता शहात्तर काळे हा पळून जात असताना त्यास गुन्हे शाखेच्या वरील तीनही थरारक पाठलाग करून पकडले.या थरार नाट्याची चर्चा बुधवारी संपूर्ण इसबावी परिसरात चर्चिली गेली आहे
.
हद्दपारीतील आरोपी दत्ता शहात्तर काळे यास थरारक पाठलाग करून जेरबंद केल्यामुळे वरील तीनही पोलीस कार्मचाऱ्यांचे अभिनंदन केले जात असून सदर आरोपी विरोधात भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता 1951 चे कलम 56 (1) (अ) (ब) अंतर्गत हद्द्पार / एस/आर/38/2019 दिनांक 03/02/2020 या आदेषाचा भंग केला म्हणून त्याचे विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम 142 प्रमाणे र फिर्याद दाखल करण्यात आली आहे
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

1 month ago