हनुमंत देशमुख यांचा मंगळवारी सेवानिवृत्ती निमित्त नागरी सत्कार

हनुमंत देशमुख यांचा मंगळवारी सेवानिवृत्ती निमित्त नागरी सत्कार

नारायण चिंचोली,ईश्वर वठार व भैरवनाथवाडी ग्रामस्थांच्या वतीने आयोजन

पंढरपूर शहर व तालुका पोलीस ठाण्यासह अनेक पोलीस ठाण्यात कार्यरत असताना आपल्या कर्तव्यदक्षतेमुळे अनेक पुरस्काराचे मानकरी ठरलेले सेवानिवृत्त स.पो.नि.हनुमंत देशमुख यांचा मंगळवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता पंढरपूर तालुक्यातील भैरवनाथडी येथे नारायण चिंचोली,ईश्वर वठार व भैरवनाथवाडी ग्रामस्थांच्या व हर्षवर्धन देशमुख मित्रमंडळाच्या वतीने भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

       आ. प्रशांत परिचारक यांच्या हस्ते तर प्रांताधिकारी सचिन ढोले,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे,तालुका पोलीस निरीक्षक किरण अवचर,पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे,मा. सभापती ऍड.वामनराव माने,कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती दिलीप घाडगे,जि.प सदस्य सुभाष माने,वसंत देशमुख,लक्ष्मण धनवडे,तानाजी वाघमोडे,सुरेश आगवणे,औदुंबर मेटकरी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.  

    तरी सत्कार सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन मा.सरपंच  नारायण देशमुख,शिवसेना तालुका प्रमुख महावीर देशमुख,सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन दादाराजे देशमुख,प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेश उपाध्यक्ष संपत देशमुख यांनी केले आहे.  

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

12 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago