मोडनिंब आणि माढा येथे लवकरच नव्याने एमआयडीसीची उभारणी
ना.अदिती तटकरे यांच्यासमवेत आ.बबनराव शिंदे आ.संजय शिंदे यांची बैठक एमआयडीसीचे अनेक अधिकारीही बैठकीस उपस्थित
ऊस उत्पादन आणि साखर कारखानदारी यामुळे माढा तालुक्याच्या अर्थकारणाला गती मिळाली असतानाच आता या तालुक्यात आणखी दोन एमआयडीसी क्षेत्राची उभारणी करण्यास मुंबई येथे झालेल्या बैठकीत तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे.ना. अदिती तटकरे यांच्या समवेत या बैठकीस आ. बबनराव शिंदे आणि आ.संजय शिंदे यांच्यासह महाराष्ट्र औधोगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, उपअभियंता सुनिल चि. कोलप, भूसंपादनचे महाव्यवस्थापक गोपीनाथ ठोंबरे आदी उपस्थित होते.
यावेळी आ. बबनराव शिंदे यांनी माढा तालुक्याच्या औद्योगिक विकासासाठी एमआयडीसी क्षेत्राची उभारणी करणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणून देत एमआयडीसी साठी आवश्यक असलेल्या नजीकचा रेल्वे मार्ग,रस्ते मार्ग व पाण्याची सुविधा उपलब्ध असल्याने माढा आणि मोडनिंब येथे एमआयडीसी उभारणे शक्य असल्याचे सांगितले.माढा तालुक्यातील टेम्भूर्णी येथे यापूर्वीच एमआयडीसीची उभारणी झाली असून आता आणखी दोन एमआयडीसी तालुक्यात उभारल्या जाणार असल्याने या परिसरातील आर्थिक विकासास चालना मिळणार आहे तर बेरोजगारांना रोजगाराची संधीही मिळणार आहे.
आ.बबनराव शिंदे आणि आ. संजय शिंदे यांनी या भागातील अनेक वर्षाच्या मागणीला न्याय मिळवून देण्यासाठी आग्रही भूमिका घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…