बाबा जय गुरुदेव धर्मप्रचार संस्थेच्या वतीने पंढरीत व्यसनमुक्ती व शाकाहार प्रसारासाठी सामुहीक परिक्रमा

बाबा जय गुरुदेव धर्मप्रचार संस्थेच्या वतीने पंढरीत व्यसनमुक्ती व शाकाहार प्रसारासाठी सामुहीक परिक्रमा

उज्जैन मध्यप्रदेश येथील बाबा जय गुुरदेव धर्मप्रसारक संस्थेच्या वतीने पंढरीत शाकाहार प्रसार व व्यसनमुक्ती प्रबोधन रॅलीचे रविवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते.येथील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन गणेश कोले यांच्याहस्ते ध्वजा उंचावत या रॅलीस सुुरवात करण्यात आली विठ्ठल मंदीरासह पंढरीतील प्रमुख रस्त्यावरुन या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीत संस्थेचे 40 साधक सहभागी झाले होते.मा.आ.सुधाकरपंत परिचारक यांनी या रॅलीचे स्वागत केले.
बाबा जयगुरुदेव यांचे आध्यात्मिक उत्तराधिकारी संत उमाकांत महाराज यांच्या प्रेरणेतून जनजागरणाच्या हेतूने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.शाकाहार हाच उत्तम आहार,नशामुक्ती म्हणजे पुर्नजिवन,सदाचारी वर्तन म्हणजे परमेश्‍वराच्या अनुग्रहाचे प्रतिक आदी विचारांचा प्रसार या परिक्रमेतून करण्यात आला.विठ्ठल मंदीर समितीच्या सदस्या शकुंतला नडगीरे,श्री कदम यांनीही या परिक्रमेचे स्वागत केले.यावेळी शकुंतला नडगीरे यांनी शाकाहाराचे महत्व विषद केले.तर या रॅलीचा समारोप दत्तात्रय बडवे यांच्याहस्ते ध्वजपुजा करुन करण्यात आला.
या प्रबोधन रॅलीचे यशस्वी आयोजन करण्यासाठी बाबा जयगुरुदेव संस्थेचे पुणे येथील साधक अजय शूक्ला,बचनसिंह,अरविंद शाह,देवेश द्विवेदी,सुषमा शुक्ला,चांदनी सिंह आदींनी परिश्रम घेतले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

8 minutes ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago