ताज्याघडामोडी

कर्मयोगी इन्स्टिट्यूट चे प्राध्यापक अनिल बाबर यांना पीएचडी पदवी प्रदान

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख प्रा. अनिल बाबर यांना विश्वेश्वरय्या तंत्रशास्त्र विद्यापीठ, बेळगाव यांच्यातर्फे नुकतीच पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
“व्हर्मी कंपोस्टिंग ऑफ शुगर केन ट्रैश अँड इट्स एप्लीकेशन इन डिग्रेडेशन ऑफ इमर्जिंग पोल्युटेंट्स इन सॉईल” या विषयांमध्ये त्यांनी संशोधन पूर्ण केले. ऊस कापणी नंतर शेतात मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या सेंद्रिय कचऱ्यापासून त्याचे गांडूळ खतात रूपांतर करणे हा त्यांच्या संशोधनामागचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी त्यांना प्रा. डॉ. एन एस पाटील व डॉ. संजीव संगमी यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक यांनी डॉ. अनिल बाबर यांचे अभिनंदन केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांच्या हस्ते डॉ. अनिल बाबर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. ए बी कणसे, रजिस्ट्रार जी डी वाळके, उपप्राचार्य जे एल मुडेगावकर, डॉ. अमोल अडमुठे, संशोधन अधिष्ठाता डॉ.अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. राहुल पांचाळ, विभागप्रमुख डॉ. एस एम लंबे, डॉ. एस व्ही एकलारकर, प्रा. दीपक भोसले तसेच सर्व प्राध्यापक यांनी डॉ. अनिल बाबर यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

23 minutes ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago