इंदापूरमध्ये चाकूने सपासप वार करून 33 वर्षांच्या महिलेची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.सुनिता यांच्यावर वार केल्यानंतर आरोपीने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सुनिता शेंडे या जानाई लक्ष्मी महिला सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा होत्या. तर सुनिता शेंडे यांचे पती दादासाहेब शेंडे हे समता परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. सुनिता शेंडे यांच्या हत्येमागे पतसंस्थेचा एँगल आहे का? याचा तपासही पोलीस करत आहेत. चाकूने सपासप वार करून हि हत्या करण्यात आली आहे.ज्ञानेश्वर बबन रासकर असं या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे. ज्ञानेश्वरने सुनिता शेंडे यांची हत्या का केली? याचं कारण मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही. 4 तारखेच्या रात्री ज्ञानेश्वरने निमगाव केतकी सराफवाडी रोडवर सुनिता शेंडे यांची हत्या केली आहे. आरोपी ज्ञानेश्वर रासकर हा इंदापूरच्या सुरवडचा रहिवासी आहे.
सोलापूर दि.17 (जिमाका):- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एम.पी.एस.सी) सन 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे…
*नियोजन भवन येथील सभागृहात 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता अल्पसंख्याक हक्क दिन साजरा होणार…
माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिजित पाटील यांनी सोलापूरचे जिल्हाधीकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेत…
सोलापूर दिनांक 24 (जिमाका):- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग,…
(अधिकाऱ्यांसोबत केला रेल्वेचा प्रवास आणि सांगितल्या महत्वपूर्ण त्रुटी) (मोडनिंब कार्गो टर्मिनल, रेल्वे उड्डाणपूल,माढा रेल्वे सुशोभीकरण,…
सोलापूर : खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरच्या विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.…