दुसऱ्या टप्प्यात पंपगृह,संरक्षक भिंत,बॅलन्सिंग टॅंक,उर्ध्वगामी नलिका आदी कामांचा समावेश
आ.आवताडे यांच्याकडून मुबंईत दोन दिवस ठाण मांडून पाठपुरावा
गेल्या अनेक वर्षापासून राजकारणाचा मुद्दा ठरलेली मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला आमदार समाधान आवताडे यांनी पाठपुरावा करून १३ मार्च २४ च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी मिळवली होती त्यानंतर पहिल्या टप्प्यातील १११ कोटीचे टेंडर निघून सात ऑक्टोबर रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कामाचा कार्यारंभ करण्यात आला आहे यावरही निवडणुकीच्या तोंडावर हे स्टंटबाजी सुरू असल्याचे काही विरोधकांकडून म्हटले जात असताना कार्यक्रमानंतर आमदार समाधान आवताडे यांनी दोन दिवस मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठाण मांडून दुसऱ्या टप्प्याचे टेंडर ही काढले आहे.या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे ७८ कोटी ४३ लाखाचे टेंडर काल दि १० ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाले असून निविदा मागवण्यात आल्या आहेत त्यामुळे दिवसेंदिवस या योजनेवर बोलणाऱ्या विरोधकांची बोलती बंद होत चालली आहे.पहिल्या टप्प्याच्या टेंडर नंतर आमदार समाधान आवताडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या योजनेच्या शुभारंभासाठी मंगळवेढ्यात बोलवत धुमधडाक्यात या योजनेचा शुभारंभ करून कामास सुरुवात केली आहे.पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात होते न होते तोच दुसऱ्या टप्प्यातील कामाचेही टेंडर निघाले असून ही योजना युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचा चंग आमदार समाधान आवताडे यांनी बांधला असल्याचे यावरून दिसून येत आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…