ताज्याघडामोडी

कुलगुरू डॉ. महानवर सरांनी थोपटली स्वेरीच्या विद्यार्थ्यांची पाठ स्वेरीत चित्र व हस्तकला प्रदर्शनाचे उदघाटन

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने इंजिनिअरींगच्या प्रथम वर्ष विभागाच्या इंडक्शन प्रोग्रामअंतर्गत चित्रकलेचे व हस्तकलेचे प्रदर्शन भरवले होते. या प्रदर्शनाचे उदघाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठसोलापूरचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. प्रदर्शनातील कलाकृती पाहून कुलगुरू महोदयांनी स्वेरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची पाठ थोपटली.

        प्रत्येक वर्षी प्रथम वर्ष इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर साधारणपणे एक आठवडाभर इंडक्शन प्रोग्राम’ अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विभागाअंतर्गत चित्रकला व हस्तकला प्रकल्पांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांच्या चित्रकला व हस्तकला प्रकल्पांचे प्रदर्शन राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या चित्र व हस्तकलेचे विविध आविष्कार पहावयास मिळाले. यामध्ये विद्यार्थ्यांनी निसर्ग चित्रस्वच्छताराम मंदिरस्वेरीची प्रतिकृतीप्राणी चित्रवस्तू चित्रव्यक्ती चित्रविविध इमारतींचे नमुनेछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमाथोर महापुरुषविविध कलाकृती हे सर्व पेन्सिलने रेखाटलेले होते तसेच राममंदिरमहादेव मंदिरपुंडलिक मंदिर यासारख्या विविध मंदिरांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारल्या होत्या. विविध शास्त्रीय उपकरणांचे मॉडेल्स सुद्धा विद्यार्थ्यांनी या उपक्रमात बनविले होते. ह्या प्रतिकृती पाहण्यासाठी स्वेरीतील विद्यार्थ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. विद्यार्थ्यांनी प्रत्येक चित्र अत्यंत रेखीवपणेआकर्षक आणि सजीव वाटणारे असे रेखाटले होते. शिक्षणातून वेळ काढून काही काळ आपले छंद जोपासले पाहीजेतया हेतूने अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना व छंद कागदावर रेखाटले होते. सर्व कलाकृती पाहून त्या बाबतची माहिती कुलगुरू महोदयांनी जाणून घेतली. यावेळी विद्यार्थ्यांच्या कला आविष्कारांचे त्यांनी भरभरून कौतुक केले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी बनविलेली जवळपास ५०० छायाचित्रे व कलाकृती मांडल्या होत्या. यावेळी त्यांच्या समवेत एस.पी.कॉलेजपुणेचे माजी प्राध्यापक विनय रमा रघुनाथस्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगेमाजी अध्यक्ष व विश्वस्त एन.एस. कागदेसंस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठलविश्वस्त एच.एम.बागलविश्वस्त बी. डी. रोंगेयुवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगेस्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज डॉ. एम.एम.पवारबी. फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियारडिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन. डी. मिसाळडी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवेउपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवारविद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपतीसांस्कृतिक कार्यक्रमाचे विभागप्रमुख डॉ. आर. एन. हरीदाससर्व अधिष्ठाताप्रथम वर्ष इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकरप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारीपालक व विद्यार्थी उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

13 hours ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

2 days ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

7 days ago

मंगळवेढा तालुक्यासाठी ६ कोटी ४५ लाख रुपये फळ पिक विमा मंजूर- आ समाधान आवताडे

पुनर्रचित हवामानावर आधारित फळपेत विमा योजना रब्बी हंगाम २०२३ साठी फळ पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांचा…

1 week ago

चेअरमन अभिजित पाटील यांच्या संकल्पनेतुन माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

१२ ऑक्टोबर पासून ५ दिवस कृषी,कृषी उद्योग मार्गदर्शन,प्रदर्शन,सांस्कृतिक कार्यक्रम  श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन…

2 weeks ago