ताज्याघडामोडी

स्वेरी मध्ये ‘नो प्रायव्हेट व्हेईकल डे’ साजरा ‘मेसा’ चा स्तुत्य उपक्रम

 पंढरपूर- राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त स्वेरीमध्ये‘नो प्रायव्हेट व्हेईकल डे’ साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत स्वेरी संचालित इंजिनिअरिंग व फार्मसीच्या पदवी व पदविका तसेच एमसीए व एमबीए या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या वाहनांना एक दिवस सुट्टी दिली. स्वेरीच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे. 

            स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे व प्रा. पूजा रोंगे हे ‘नो प्रायव्हेट व्हेईकल डे’ असल्यामुळे गेंड वस्तीपासून ते ठाकरे चौकापर्यंत चालत आले. तेथून स्वेरी कॉलेज पर्यंत बोलेरो या वाहनाने आले. डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ व त्यांचे इतर प्राध्यापक वर्ग सायकलवरून, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम.जी.मणियार, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतीश मांडवे, रजिस्ट्रार राजेंद्र झरकर व इतर प्राध्यापक हे एस.टी. ने कॉलेजला आले. तर स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम. पवार व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार हे ऑटो रिक्षाने महाविद्यालयात पोहोचले. एकूणच स्वेरीचे प्राध्यापक व  शिक्षकेतर कर्मचारीसहित सर्व स्टाफ यांनी स्वतःच्या वाहनाला सुट्टी दिली होती. यामुळे स्वेरी कॅम्पस मध्ये देखील वाहनांची वर्दळ नव्हती. यामध्ये काही प्राध्यापक रिक्षा, बस आदी वाहनांनी तर कांही प्राध्यापक चक्क चालत कॉलेजला आले. प्राध्यापक वर्ग बसमधून, सायकल वरून कॉलेजच्या प्रवेश द्वाराजवळ येताच विद्यार्थी गुलाब पुष्प देवून त्यांचे स्वागत करत होते. एकूणच दर वर्षीप्रमाणे यंदाही ‘नो प्रायव्हेट व्हेईकल डे’ यशस्वीरित्या साजरा करण्यात आला. स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील मेसा (मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडन्ट असोसिएशन) मधील विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने हा एकदिवसीय ‘नो प्रायव्हेट व्हेईकल डे’ साजरा केला. या उपक्रमाचे पंढरपूर परिसरात व सर्वत्र कौतुक होत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

5 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago