ताज्याघडामोडी

पंढरपूर शहराच्या बाह्य वळण मार्गातील चौका चौकात गतिरोधक व सुचना फलक लावा शिवसेना ठाकरे गटाची बांधकाम विभागास निवेदन देत मागणी

पंढरपूर शहराच्या बाह्य वळण मार्गावरील क्रांतीसिह नाना पाटील चौक. प्रबोधनकार ठाकरे  चौक. अहिल्या चौक . कासेगाव फाटा. पंत चौक आदी ठिकाणी गतिरोधक व सुचना फलक  नसल्याने बाह्य वळण मार्गावरून जाणाऱ्या वाहनांचे वारंवार अपघात घडत आहेत  कित्येक माणसांना आज पर्यंत आपला जीव गमवावा लागला आहे तर कित्येकांना कायमचे अपंगत्व आले आहे दिवसेन दिवस वाहनांची संख्या वाढत चालली आहे. या बाह्य वळण मार्गावरील चौका चौकात  सुचना फलक  व स्पीडब्रेकर  आसणे अतिशय गरजेचे आहे…
पंढरपूर शहरातील अंतर्गत रस्त्या वरून बाह्य वळण मार्गाला जोडणाऱ्या प्रत्येक चौकात गतिरोधक व सुचना फलक लावल्यास याचा अपघातांवर मोठा परिणाम  होऊन अनेक जीव वाचतील तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने याची गंभीर दखल घेऊन त्वरित स्पीडब्रेकर व सुचना फलक उभे करावेत अन्यथा बांधकाम प्रशासनाचे  लक्ष  वेधण्या साठी बोंबाबोंब आंदोलन छेडण्यात येईल व  होणार्या परिणामास बांधकाम प्रशासन जबाबदार राहील. आसा इशारा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख बंडू घोडके यांनी संपर्कप्रमुख अनिलजी कोकीळसाहेब व जिल्हाप्रमुख  संभाजीराजे शिंदे यांच्या आदेशाने लेखी निवेदना द्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाला आज दिला आहे
या वेळी जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे इंद्रजित गोरे संजय घोडके नागेश रितुंड अर्जुन भोसले उत्तम कराळे संगिताताई पवार अनिताताई आसबे संजय पवार कल्याण कदम बाबासाहेब पाटील महमंद पठाण जालिंदर शिंदे अदित्य घोडके आकाश माने नामदेव चव्हाण विजय बागल नागेश जाधव महावीर हाके बळीराम देवकते अजित पवार हर्षवर्धन जाधव
आदी शिवसैनिक मोठ्या संख्येन हजर होते..

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

11 hours ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

2 days ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

7 days ago

मंगळवेढा तालुक्यासाठी ६ कोटी ४५ लाख रुपये फळ पिक विमा मंजूर- आ समाधान आवताडे

पुनर्रचित हवामानावर आधारित फळपेत विमा योजना रब्बी हंगाम २०२३ साठी फळ पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांचा…

1 week ago

चेअरमन अभिजित पाटील यांच्या संकल्पनेतुन माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

१२ ऑक्टोबर पासून ५ दिवस कृषी,कृषी उद्योग मार्गदर्शन,प्रदर्शन,सांस्कृतिक कार्यक्रम  श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन…

2 weeks ago