ताज्याघडामोडी

विचारात सकारात्मकता असल्यास व्यक्ती प्रफुल्लित होतो -ब्रह्मकुमार पियुषभाई स्वेरीत ‘निसर्ग, पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन सत्र संपन्न

पंढरपूर- ‘कोणतेही कार्य करताना चेहऱ्यावर हास्य ठेवणे आवश्यक आहे. चेहऱ्यावरील हास्यामुळे आपली कामे अधिक सहजपणे होतात तसेच कामाचा कितीही ताण-तणाव असू द्या परंतु जर मनाची एकाग्रता अभंग ठेवली तर हाती घेतलेले काम पूर्णत्वाकडे झुकते. कोणतेही काम करताना आपल्या चेहऱ्यावर उत्साह असावा तसेच विचारात सकारात्मकता ठेवल्यास व्यक्ती अजून प्रफुल्लित होतो.’ असे प्रतिपादन ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाचे ब्रह्मकुमार पियुषभाई यांनी केले.

         गोपाळपूर ( ता. पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या खुल्या रंगमंचावर ‘निसर्ग, पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन’ या विषयावर आयोजिलेल्या एक दिवशीय मार्गदर्शनसत्रामध्ये ब्रह्मकुमार पियुषभाई ‘विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि त्यांची मानसिकता’ यावर मार्गदर्शन करत होते. महाराष्ट्र गीत व स्वेरी गीतानंतर प्रास्ताविकात संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे म्हणाले की, ‘जीवनात उत्तम मार्गदर्शनाची गरज असते त्यामुळे आपले जीवन योग्य दिशेने जावून सुखकर होते. जीवनाच्या प्रवासात मार्गदर्शक गुरु आवश्यक आहेत जे सामान्य माणसांना योग्य दिशा देऊ शकतात. आपण प्रयत्न करणे जो पर्यंत सोडून देत नाही तोपर्यंत अपयश हे अपयश नसते. अशावेळी आपल्या मनाला मन:शांतीची आवश्यकता असते. ही मन:शांती आपले मार्गदर्शक उत्तमप्रकारे देवू शकतात.’ प्रेरणादायी मार्गदर्शिका ब्रह्मकुमारी अस्मिता बहेनजी म्हणाल्या की, ‘चांगले बोला, चांगले पहा व चांगले ऐका याचबरोबर ‘चांगले विचार करणे‘ आवश्यक बनले आहे. यासाठी मोठी स्वप्ने पहा, त्यांचा पाठपुरावा करा म्हणजे आपण इच्छित ठिकाणी लवकर पोहोचू. यासाठी सर्वप्रथम आपल्या अंतरंगी समाधान ठेवणे गरजेचे आहे. जेवढ्या अपेक्षा वाढत आहेत तेवढे आपण दुःखाच्या खाईत लोटले जात आहोत. त्यामुळे कोणावरही अपेक्षेचे ओझे लादू नका, आपले जीवन सुखमय बनवा तसेच व्यक्तिगत आनंददायी जीवनातून विश्व शांति निर्माण करणे हा ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाचा मुख्य उद्देश आहे.’ ब्रह्माकुमारी सोमप्रभा बहेनजी म्हणाल्या की, ‘मनुष्याच्या चारित्र्याची जडणघडण करणे तसेच काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे माणसात असलेले षडविकार कमी करणे आवश्यक आहे. स्वेरी मधील नियमित घेतले जाणारे प्राणायाम हे देखील एक प्रगतीचे मुख्य लक्षण आहे. कारण आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी प्राणायामाची गरज आहे.’ पुढे बोलताना ब्रह्मकुमार पियुषभाई म्हणाले की, ‘सूर्योदय होण्यापूर्वी जागे झाले पाहिजे कारण सकाळी सकारात्मक ऊर्जा अधिक असते. त्यामुळे महत्त्वाचे कार्य सकाळीच आटोपते घ्यावे. सूर्योदयानंतर जागे होणे म्हणजे सर्व कामे आपणहून रखडवणे. इतर लोकांना बोलण्यासाठी ‘फोन’ची गरज असते मात्र स्वतःला बोलण्यासाठी ‘मौना’ची गरज आहे. आजकाल दुनियेमध्ये कुठे काय चालू आहे याची अचूक माहिती जाणून घेतो पण आपल्या अंतरंगात नेमके काय चालले आहे, हे पाहण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही.’ असे सांगून ब्रह्मकुमार पियुषभाई यांनी ‘लीडर’ आणि ‘मॅनेजर’ यांतील फरक स्पष्ट केला. यावेळी विद्यार्थ्यांकडून प्रेरणादायी विविध प्रात्यक्षिके करून घेतली. ब्रह्मकुमार प्रतापभाई शिंदे यांनी ‘प्रकृती, पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन’ याविषयी प्रतिज्ञा दिली. यावेळी ब्रम्हकुमारी संगीता बहेनजी, उज्वला बहेनजी, गीता बहेनजी, नीता बहेनजी, मीरा बहेनजी, लता बहेनजी, कीर्ती बहेनजी, दुर्गा बहेनजी, जयश्री बहेनजी, कांचन बहेनजी, धनंजयभाई, मस्केभाई, चव्हाणभाई, मोरेभाई, उमेशभाई तसेच स्वेरीच्या बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम. जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस.व्ही.मांडवे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, सांस्कृतिक कार्यक्रम विभागाचे प्रमुख डॉ. आर. एन. हरिदास, स्वेरी अंतर्गत असलेल्या अभियांत्रिकी, फार्मसीच्या पदवी व पदविका तसेच एमबीए, एमसीए या पदव्युत्तर पदवीचे प्राध्यापक व  विद्यार्थी उपस्थित होते. प्रथम वर्ष अभियांत्रिकेचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago