पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त स्वेरीच्या ‘इन डोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स’ मध्ये ‘बुद्धिबळ आणि बॅडमिंटन’ या दोन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
स्वेरीच्या स्पोर्ट्स क्लब तर्फे आयोजिलेल्या या स्पर्धेत पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी व महिला दुहेरी आणि मिश्र अशा प्रकारच्या बुद्धिबळ आणि बॅडमिंटन स्पर्धांमध्ये एकूण १५७ खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धांमधून खेळाची चपळता, त्यांचा वेग, खेळासाठी असलेला उत्साह, धोरणात्मक खेळ आणि खिलाडीवृत्ती अशी विविध कौशल्ये दिसून आली. बुद्धिबळ स्पर्धेमध्ये मुलींचा सहभाग अधिक होता. या स्पर्धांसाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू असलेले भारत अशोक पाटील हे लाभले होते. भारत पाटील यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील कोच चा दांडगा अनुभव आहे. मलेशिया, सिंगापूर, चायना, थायलंड येथील स्पर्धांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांची युरोप मधील बास्केटबॉल अकॅडमी प्रो-प्लेसमेंट प्रोग्रॅम २०-२० मध्ये निवड झाली होती. २००४ पासून राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. सध्या ते ‘गोवा बास्केटबॉल टीम‘चे कर्णधार म्हणून कार्यरत आहेत. अभ्यासाबरोबर शारीरिक सशक्तता किती महत्त्वाची आहे हे त्यांनी यावेळी पटवून सांगितले. महिला बुद्धिबळ स्पर्धेमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या नेहा झिरपे यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग च्या प्रियांका चव्हाण यांचा पराभव करून अशक्यप्राय असा विजय मिळवला. पुरुष बुद्धिबळ स्पर्धेमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील गणेश दंगेकर यांनी सिव्हील इंजिनिअरिंग विभागातील ओम कलुबर्मे यांचा पराभव करून विजय प्राप्त केला. बॅडमिंटन स्पर्धेमध्ये महिलांच्या श्रेणीत कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या आश्लेषा काळे यांनी त्यांच्याच विभागाच्या वैष्णवी मेनकुदळे यांचा पराभव केला. बॅडमिंटन महिला सांघिक स्पर्धेमध्ये अस्मिता काळे व आश्लेषा काळे यांनी गीता नवले आणि धनश्री हाके यांचा पराभव करून दमदार विजय प्राप्त केला. पुरुष सांघिक संघामध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या समर्थ कुलकर्णी आणि कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या वरद लोकरे यांनी यश कदम व जय गाडेकर यांचा पराभव करून विजय प्राप्त केला. स्पर्धकांनी उल्लेखनीय खेळ करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. या यशस्वी खेळाडूंना स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार यांच्या सहकार्याने तसेच उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, क्रीडा मार्गदर्शक प्रा.संजय मोरे व क्रीडा प्रशिक्षक दीपक भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी. पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, इतर अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले. या संपूर्ण स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी बालाजी शेंबडे, चैतन्य सोनवणे, स्वप्निल भोसले, आदित्य चोरमले, पृथ्वीराज कन्हेरे, प्रताप लवळे, मनोज शिंदे, विजय कारंडे, रोहित तांबवे, हुसेन मुलाणी, सोनाली कांबळे, ज्ञानेश्वरी मिटकरी, ज्ञानेश्वरी गोफने, दत्तात्रय आहेरवाडी, सचिन करकत, गौरी सराटे, जुई गोसाने, स्वराली नकाते यांचे सहकार्य लाभले. मानसी कंदी व सोनाली कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून आभार मानले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…