आणि क्लस्टर हेड प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत दिला गेलेला अबकी बार ४०० पारचा नारा
एक सहज विश्लेषण !
माढा लोकसभा मतदार संघातून भाजपकडून खासदार रणजितसिह निंबाळकर यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपकडूनच उमेदवारीसाठी आग्रही राहिलेले धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज झाले आहेत.त्यांनी बंडाचे निशाण फडकवावे यासाठी त्यांचे समर्थक आग्रही आहेत.शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉग्रेसकडून उमेदवारी घेऊन निवडणूक लढवावी असाही आग्रह सर्मथक धरताना दिसून आले आहेत.मात्र भाजपकडून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही झाला.भाजपचे संकट मोचक समजले जाणारे मंत्री गिरीश महाजन हे अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर गेले आणि नाराजी जाणूनही घेतली.मोहिते पाटील यांची नाराजी परवडणारी नाही असे विधानही त्यांनी माध्यमांशी बोलताना केले खरे पण मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न पक्षाने सोडून दिले आहेत अशीच चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.हा सारा वाद सुरु असताना माढा मतदार संघाचे प्रभारी असलेले प्रशांत परिचारक हे या वादा पासून दूर राहण्यासाठीच बाहेरगावी जाणे पसंत केले होते अशीही चर्चा झाली.मोहिते पाटील यांचा शब्द प्रमाण मानणारा मतदार पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात मोठ्या प्रमाणात आहे हेही त्याचे कारण असावे अशीही शक्यता वर्तविली गेली.मात्र मोहिते पाटील यांचे नाराजी नाट्य जरा जास्तच लांबणीवर पडतंय आणि नाराजीच्या नावाखाली काही समर्थक तुतारीवर प्रेम व्यक्त करताना दिसून येत असल्याचा मेसेज वरिष्ठापर्यंत गेल्यामूळेच भाजपच्या वरिष्ठानी मोहिते पाटील यांची समजूत काढण्यास ब्रेक लावला अशीही चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.
आणि या मागे उत्तम जानकर यांनी सांगितलेली माळशिरस तालुक्यातील मतांची आकडेवारी हेही कारण असल्याचे मानले जात आहे.२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत माळशिरस तालुक्यातून भाजपला लाखाचे लीड मिळाले खरे पण पुढे सहाच महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विधानसभेचा उमेदवार असलेले राम सातपुते हे केवळ अडीच तीन हजार मतांनी विजयी झाले होते.आणि या वरूनच माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील विरोधक देखील तितकेच प्रबळ आहेत हेच निरीक्षण नोंदवले गेले होते.अशातच आता धैर्यशील मोहिते पाटील हे जरी बंडाच्या पवित्र्यात असले तरी त्यांचे बंधू भाजपचे आमदार रणजितसिह मोहिते पाटील यांनी आज होळीच्या शुभेच्छा देताना भाजपच्या कमळ चिन्हासहित फोटो ट्विट केला आहे.यावरूनच रणजितदादा तूर्तास तरी भाजप सोडण्याच्या तयारीत नाहीत असाही अंदाज बांधला जात आहे.मात्र आजच माढा लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टी लोकसभा कोअर कमिटी व लोकसभा चुनाव प्रबंध समितीची बैठक सोमवारी मकरंद देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थिती टेंभुर्णी येथे पार पडली.या बैठकीस खासदार श्री.रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे,आमदार राम सातपुते, भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, रश्मीदीदी बागल, राजकुमार पाटील, जयकुमार शिंदे तसेच माढा लोकसभा कोर कमिटी सदस्य, चुनाव प्रबंध समितीचे सदस्य आदी पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाची ध्येय धोरणे जनसामान्यांपर्यंत नेऊन पक्ष वाढीसाठी आणि संघटना बळकटीकरणासाठी समर्पित भावनेने कार्य करावे असे आवाहन केले. यावेळी ‘फिर एक बार मोदी सरकार’, ‘अबकी बार ४०० पार’ अशा घोषणा देत सहकाऱ्यांसह विजयी निर्धार केला मात्र या बैठकीस सोमवारी आमदार रणजितसिह मोहिते पाटील मात्र उपस्थित नव्हते.रणजितसिह मोहिते पाटील का उपस्थित राहिले नाहीत ? याची अधिकृत माहिती मिळाली नसल्याने भाजपच्या समर्थकांत मात्र पुन्हा अस्वस्थता निर्माण झाली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…