ताज्याघडामोडी

रात्री कामासाठी मुलं बाहेर पडले; पत्नी गाढ झोपेत, पतीचं अचानक धक्कादायक कृत्य

गाढ झोपेत असलेल्या पत्नीची क्रुरपणे पतीने हत्या केल्याची खळबळजनक घटना जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या वेडगाव येथे गुरुवारचा मध्यरात्री घडली. मुलं कापूस भरायला गेली असताना पतीने कुऱ्हाडीने गळ्यावर वार करून पत्नीची हत्या केली. लता दामोदर धुडसे (४०) असे मृतक महिलेचे नाव आहे. घटना उघडकीस येतात गाव हादरले आहे. गावकऱ्यांनी घटनेची माहिती पोलीस विभागाला दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठण्याआधीच पती दामोधर मारोती धुडसे फरार झाला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान हत्येचे नेमकं कारण अद्याप पुढे आलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, गोंडपिपरी तालुक्याचा शेवटचा टोकावर असलेलं वेडगाव हे लहानस गाव. या गावात गुरुवारच्या मध्यरात्री हत्येचा थरार घडला. गावातील दामोधर मारोती धुडसे यांची दोन मुले कापसाची गाडी भरायला गेले होते. पत्नी लता धुडसे या गाढ झोपेत होत्या. मध्यरात्रीचा सुमारास पती दामोधर याने हातात कुऱ्हाड उचलली. त्याने लता हिचा मानेवर सपासप वार केले. यात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घरात रक्ताचा सळा सांडला होता.

घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी दामोधर याच्या घराकडे धाव घेतली. काहींनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. गावकऱ्यांना बघताच दामोधर हा घटनास्थळावरून फरार झाला. चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु यांनी घटनास्थळ गाठले. त्यांच्या मार्गदर्शनात लाठीचे ठाणेदार युवराज शहारे यांनी मोका पंचनामा केला. आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार असलेल्या पतीचा शोध पोलीस घेत आहे. पुढील तपास लाठी पोलीस करीत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

3 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

7 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago