प्रेम अंधळं असतं आणि त्यात कोणत्याही थराला जाण्याची तयारी असते याची प्रचिती पुन्हा आली आणि महाराष्ट्र हादरला आहे. प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीला पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीला संपवण्यासाठी चक्क दीड लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती.
प्रेमात अडथळा ठरत असलेल्या पतीचा पत्नी आणि तिच्या प्रियकराने दीड लाखांची सुपारी देऊन हत्या केली आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पोलीसही चक्रावले आहेत. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी पत्नी, तिच्या प्रियकरासह पुण्यातून पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील कोथूळ येथे योगेश सुभाष शेळके या तरुणाच्या खुनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराने योगेशच्या खुनाचा कट रचला. विशेष म्हणजे पत्नीनेच पोलिसांत याबाबत फिर्याद दिली होती. फिर्यादीच आरोपी निघाल्याने पोलिसांसह सर्वांनाच धक्का बसला आहे.
योगेश सुभाष शेळके हा पत्नी आणि आई- वडिलांसह कोथूळ गावात राहत होता. त्याच्या पत्नीचे गावातीलच रोहित साहेबराव लाटे याच्याशी प्रेमसंबंध होते. या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचा योगेशला संशय होता. या संशयातून तो पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण करत होता. पती नेहमीच मारहाण करत असल्याने पत्नी आणि तिचा प्रियकराने मिळून नवऱ्याचा काटा काढायाचा प्लॅन केला.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…