ताज्याघडामोडी

प्रकाश आंबेडकर यांचा संयम सुटला, थेट महाविकास आघाडीलाच गंभीर इशारा; राजकीय वर्तुळात खळबळ

महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत आमचा समावेश करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर वारंवार करत आहेत. मात्र, त्यांचा अद्यापही महाविकास आघाडीत समावेश करण्यात आलेला नाही.

त्यामुळे प्रकाश आंबेडकर अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. आज तर प्रकाश आंबेडकर यांचा संयमच सुटला आहे. त्यांनी थेट आघाडीलाच निर्वाणीचा इशारा दिला आहे. आम्हाला महाविकास आघाडीत घ्या, नाही तर निवडणुकीत तुम्हालाही गाडू, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या इशाऱ्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

प्रकाश आंबेडकर यांची अमरावतीत सभा होती. यावेळी त्यांनी हा गंभीर इशारा दिला. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन दोन वर्षे झाले पण यांच्यात अजूनही समझोता झालेला नाही. जागा वाटप झालं नाही. त्यामुळे मला संशय वाटत आहे. यांना खरंच भाजप आणि मोदींना हरवायच आहे का? हा माझा सवाल आहे. आम्हाला म्हणतात दोन जागा घ्या. यांना काय आम्हाला बळीचा बकरा करायचे आहे काय? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला.

तुम्ही आम्हाला चर्चेत घेतलं तर आम्ही तुमच्या सोबत येऊ. पण तुम्ही आम्हाला विचारतच नसाल आणि इथल्या गरीब मराठ्यांसारखा वापर करत असाल तर ते जमणारं नाही. तसं करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर आम्ही भाजपबरोबर तुम्हालाही गाडू, असा इशाराच आंबेडकर यांनी दिला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago