आधुनिक काळातही माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत असतात. अशीच एक घटना बिहारमधील भागलपूरमध्ये घडली असून प्रेमविवाहाला असलेल्या विरोधातून वडील आणि भावाने तरुणीसह तिच्या पती आणि मुलीची हत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, भागलपूर येथील गोपाळपूर परिसरात राहणाऱ्या चंदा देवी आणि चंदन कुमार यांचं एकमेकांवर प्रेम होतं. मात्र चंदाच्या कुटुंबीयांच्या या प्रेम प्रकरणाला विरोध होता. त्यामुळे चंदा देवी आणि चंदन कुमार यांनी २०२१ मध्ये पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांचा विरोध असल्याने लग्नानंतर दोघेही दूर जाऊन राहात होते. दोघांचा सुखी संसार सुरू होता. मात्र आता दोन वर्षांनंतर कुटुंबाचा विरोध मावळला असेल असा विचार करून दोघेही आपल्या मूळ गावी राहायला आले. मात्र आजचा दिवस या जोडप्यासाठी भयंकर ठरला.
चंदा देवी आणि चंदन आपल्या २ वर्षीय मुलीसह कामानिमित्त बाहेर पडल्यानंतर वाटेत दबा धरून बसलेल्या चंदाचे वडील पप्पू सिंह आणि भाऊ धीरज कुमार यांनी त्यांना अडवलं आणि गोळ्यांचा वर्षाव सुरू केला. या गोळीबारात चंदा आणि चंदन या जोडप्यासह त्यांची २ वर्षीय मुलगीही जागीच ठार झाली. प्रेमविवाहाच्या रागातून घडलेल्या या घटनेनं बिहारमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या तिहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले. या गंभीर प्रकरणाची दखल घेत आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. मात्र अजूनही आरोपींना पकडण्यात यश आलं नसून जिल्ह्यातील विविध ठिकाणी त्यांचा शोध घेतला जात आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…