ताज्याघडामोडी

15 वर्षांची मुलगी प्रियकरासोबत लग्नासाठी बसली अडून, आईने गोळी झाडून केली हत्या

अल्पवयीन मुलीने प्रियकराशी लग्नासाठी हट्ट केल्यानं आईनेच तिची गोळी झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १५ वर्षांच्या मुलीचे शेजारी राहणाऱ्याच एका मुलावर प्रेम होतं आणि तिला त्याच्याशीच लग्न करायचं होतं. आईने मुलगी हट्ट सोडत नसल्याने गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी आईला अटक केली आहे. ज्या पिस्तुलातून गोळी झाडली ते पिस्तुल जप्त करण्यात आलंय. झारखंडच्या गिरिडीहमध्ये ही घटना घडलीय.

बगोदरमधील एका अल्पवयीन मुलीची शनिवारी सायंकाळी गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात हजर होत आपणच हत्या केली असल्याचं सांगितलं. जेव्हा ही बाब सर्वांना समजलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. तर या प्रकरणी आरोपी महिलेच्या पतीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी महिलेला मुख्य आरोपी केलं आहे.

याप्रकरणी एसडीपीओ नौशाद आलम यांनी सांगितलं की, प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीला गोळी मारून आईने तिची हत्या केली. मुलीचं लग्न आई दुसऱ्या मुलासोबत लावून देणार होती पण मुलगी प्रियकरासोबतच लग्नासाठी हट्ट धरून बसली होती. यामुळे आईने मुलीला गोळी झाडून ठार केलं. पिस्तुल कुठून मिळाली आणि ते कधी आणलं याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago