ताज्याघडामोडी

मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या विविध विकासकामांसाठी ५ कोटी निधी मंजूर – आ.समाधान आवताडे

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये ग्रामीण भागातील मूलभूत सोयी सुविधा करण्यासाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये २५१५ – १२३८ या योजनेअंतर्गत ग्रामविकास व पंचायत राज विकास विभागाकडून विविध विकास कामांसाठी निधीची मागणी केली असता मतदारसंघातील कामांसाठी शासन अध्यादेशाद्वारे ५ कोटीनिधीला मंजूरी मिळाली असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.

आमदार आवताडे यांनी सांगितले आहे की, पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील विविध विकास कामांसाठी निधीची मागणी केली होती. सदर मागणीला राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्हा  पालकमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकास मंत्री ना.गिरीष महाजन यांचे माध्यमातून हा निधी मंजूर झाला असून या निधीतून ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये सभामंडप बांधणे, तालीम बांधणे, रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे, ग्रामपंचायत कार्यालय बांधणे, स्मशानभूमी बांधणे,रस्ता खडीकरण व मुरमीकरण करणे,सामाजिक सभागृह बांधणे, भूमिगत गटार बांधणे, पेव्हिंग ब्लॉक बसवणे इत्यादी विकास कामे मार्गी लागणार आहेत.

सदर सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जाणार असून नियोजित कामांचा आराखडा तयार करून लवकरात लवकर कार्यारंभ आदेश देण्यात यावे अशा सूचना आमदार समाधान आवताडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. तसेच आपल्या गावातील मंजूर कामे सुरळीत व वेळेवर मार्गी लावण्यासाठी स्थानिक पातळीवरील राजकारण आड न आणता संबंधित ग्रामपंचायतींनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आमदार जनसंपर्क कार्यालय पंढरपूर व मंगळवेढा येथे सादर करावीत असे आवाहन जनसंपर्क कार्यालय यांचेकडून करण्यात आले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक उत्साहात संपन्न; नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड

पंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक आणि नूतन पदाधिकारी निवड कार्यक्रम आज,…

3 days ago

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

3 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 month ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

1 month ago